लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांतर्गत बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. जिल्ह्यातील १0३ परीक्षा केंद्रांवर ३२ हजार ८0९ विद्यार्थी परीक्षा देणार असून, त्यामध्ये ३१ हजार ५३८ हे नियमितचे व १ हजार २७१ विद्यार्थी रिपीटर आहेत. कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण विभाग सतर्क असून, त्यासाठी दक्षता समिती निर्माण करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावी बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, २0 मार्चपर्यंत चालणार आहे. या परीक्षेसाठी जिल्हाभरातून ३२ हजार ८0९ विद्यार्थी असून, १0३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी बुलडाणा तालुक्यात १५ केंद्रे असून, ३ हजार ७१६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यात ३ हजार ५७९ नियमित व १३७ रिपीटर आहेत. चिखली तालुक्यात १३ केंद्रे व ४ हजार ४१७ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. मेहकर तालुक्यात ८ केंद्रे असून, २ हजार ५५0 विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. देऊळगाव राजा तालुक्यात ६ केंद्रे व १ हजार ५३७ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. सिंदखेड राजा तालुक्यात ९ केंद्रे व २ हजार ९२७ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. लोणार तालुक्यात ५ केंद्रे व १ हजार ५४१ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. मोताळा तालुक्यात ५ केंद्रे व २ हजार ४ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. मलकापूर तालुक्यात ८ केंद्रे व २ हजार ६३0 विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. खामगाव तालुक्यात १२ केंद्रे असून, ४ हजार १७९ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. नांदुरा तालुक्यात ६ केंद्र व १ हजार ७४५ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. शेगाव तालुक्यात ५ केंद्र व २ हजार ६२ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. जळगाव जामोद तालुक्यात ६ केंद्र व २ हजार १४ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. संग्रामपूर तालुक्यात ५ केंद्र असून, १ हजार ४१९ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत.
सहा भरारी पथकांची राहणार नजरइयत्ता बारावीच्या परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकूण सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी निरंतर यांच्या पथकाचा समावेश आहे.