आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. या चाचण्यांमध्ये जानेफळ येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून २ मार्च रोजी घेण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमध्ये ११ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे कोविड रुग्णालयातून सुटी झालेले रुग्ण वगळता सध्या जानेफळ येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४४ झाली आहे. २ मार्च रोजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४७ जणांची रॅपिड टेस्ट घेण्यात आली असता त्यामध्ये पॉझिटिव्ह निघालेले स्थानिक ८ तर ३ जण शेजारील खेड्यातील आहेत. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या १० ते १२ दिवसात ८२५ रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या आहेेत. कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेले जानेफळ येथील एकूण ७३ पैकी २९ जणांना सुटी झाली आहेे तर सध्या ४४ जण उपचार घेत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल चव्हाण यांनी लाेकमतशी बोलताना दिली आहे.
जानेफळ येथे आणखी ११ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 5:04 AM