ठळक मुद्देमंगरुळपीर येथील घटनाअज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : ११ वर्षीय गतीमंद मुलास पळविल्याप्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द ४ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला.फिर्यादी अश्विन नामदेव चव्हाण (५०) रा.अशोक नगर मंगरुळपीर यांनी ४ सप्टेंबर रोजी पोलिसात तक्रार दिली की, २ सप्टेंबर रोजी फिर्यादीचा ११ वर्षीय गतीमंद मुलगा हा घराजवळ खेळत असतांना अज्ञात आरोपीने त्याचे फायद्यासाठी माझ्या मुलास पळवून नेले. या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द भादंवी कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला.