शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बुलडाणा  जिल्ह्यात १२ जणांचा मृत्यू, ८५८ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 11:54 AM

Corona Cases : गेल्या २४ तासात कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून ८५८ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून ८५८ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. एकाच दिवशी कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू होण्याची ही जिल्ह्यातील पहिली घटना आहे. त्यामुळे बुधवाराचा कोरोना मृत्यूदर हा १.३९ टक्के होता.दरम्यान मृत्यू झालेल्यामंध्ये खामगाव तालुक्यातील शिरसगाव येथील ६८ वर्षीय व्यक्ती, खामगावातील केशवनगरमधील ४५ वर्षीय व्यक्ती, खामगावातीलच ४५ वर्षीय महिला, रोहणा येथील ६५ वर्षीय महिला, खामगाव तालुक्यातीलच सारोळा येथील ६२ वर्षीय व्यक्ती, समन्वयनगरमधील मधील ३५ वर्षीय व्यक्ती, सती फैलातील ७१ वर्षीय पुरुष, शेगावातील आरोग्य कॉलनीमधील ५२ वर्षीय महिला, मेहकर तालुक्यातील वर्दडी येथील ५५ वर्षीय महिला, बुलडाण्यातील ४६ वर्षीय पुरुष चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथील ६० वर्षीय पुरुष आणि चिखली तालुक्यातील अमडापूर येथील ६१ वर्षीय महिलेचा यामध्ये मृत्यू झाला आहे.बुधवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व रॅपीड टेस्ट किटद्वारे तपासण्यात आलेल्या ५ हजार ३८६ अहवालांपैकी ४ हजार ५२८ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ८५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४१५ व रॅपीड टेस्टमधील ४४३ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ९९१ तर रॅपिड टेस्टमधील ३,५३७ अहवालांचा समावेश आहे.दुसरीकडे पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील ९०, खामगाव तालुक्यातील ७४, शेगाव २०, देऊळगाव राजा १११, चिखली ९६, मेहकर ५२, मलकापूर ३८, नांदुरा ८०, लोणार ७३, मोताळा तालुक्यातील ३३, जळगाव जामोदमधील ४८, सिंदखेड राजातील १३९, संग्रामपूरमधील चार जणांचा यात समावेश आहे.दुसरीकडे बुधवारी ५२८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सोबतच आजपर्यंत तपासण्यात आलेल्यांमध्ये ३ लाख १३ हजार २०१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ५४ हजार ८२१ झाली असून त्यापैकी ४७ हजार १४२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.दरम्यान बुलडाण्याचा काेराेना मृत्यूदर हा १ टक्केच्या खाली आहे. आतापर्यंत  आरटीपीसीआरच्या एक लाख ७९ हजार ६६७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. रॅपीड टेस्टची संख्या १ लाख ९० हजार ९७१ झाली आहे. तर ट्रनॅटव्दारे १२ हजार ४०९ जणांच्या तपासणी करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस