लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर (बुलडाणा) : शासकीय तूर खरेदीमध्ये पदाचा दुरुपयोग करून तसेच शासनाच्या नियमांना डावलून तूर खरेदीमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी संग्रामपूर खरेदी-विक्री संघाच्या १२ संचालकांसह प्रभारी व्यवस्थापकावर सहायक निबंधकांच्या तक्रारीवरून २0 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. तूर खरेदी केंद्रावर शेतकर्यांकडून तूर खरेदी करताना खविसंच्या १२ संचालकांनी व प्रभारी व्यवस्थापकाने काटापट्टी मार्केटिंग फेडरेशनची न वापरता स्वत:च्या अधिकारातील साध्या पावती पुस्तकावर टोकन न देता तूर खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यासंदर्भात सहायक निबंधक अंभोरे यांनी तामगाव पोलिसांत तक्रार दिल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी खविसंचे अध्यक्ष राजेंद्र तुरेराव देशमुख, निरंजन सारंगधर इंगळे, गणेश मनोहर अकोटकार, मनोरमा प्रकाश फाळके, शंकर नारायण तिडके, अशोक भगवान आगरकर, प्रवीण रामदास राजनकर, अरुण गुलाबराव बोरोकार, उषा भास्कर लव्हाळे, रामराव नारायण फाळके, गंगाधर विनायक गायगोळ, गजानन श्रीराम ठोंबरे व बी.बी. निंबोळकार, प्रभारी व्यवस्थापक खविसं संग्रामपूर यांच्यावर अप.नं. १७३/१७, कलम ४२0, ४६१, ४0६, ४७१, ३४ भादंवि नुसार गुन्हे दाखल केले.
१२ संचालकांसह व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 1:43 AM
संग्रामपूर (बुलडाणा) : शासकीय तूर खरेदीमध्ये पदाचा दुरुपयोग करून तसेच शासनाच्या नियमांना डावलून तूर खरेदीमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी संग्रामपूर खरेदी-विक्री संघाच्या १२ संचालकांसह प्रभारी व्यवस्थापकावर सहायक निबंधकांच्या तक्रारीवरून २0 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. तूर खरेदी केंद्रावर शेतकर्यांकडून तूर खरेदी करताना खविसंच्या १२ संचालकांनी व प्रभारी व्यवस्थापकाने काटापट्टी मार्केटिंग फेडरेशनची न वापरता स्वत:च्या अधिकारातील साध्या पावती पुस्तकावर टोकन न देता तूर खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
ठळक मुद्देखरेदी-विक्री संघशासकीय तूर खरेदीमध्ये पदाचा दुरुपयोग