माेताळा : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी बुधवारी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड अविराेध झाली, तर चार ठिकाणी गुप्त मतदानाने सरपंचांची निवड करण्यात आली. पुन्हई येथे आरक्षण निघालेला सदस्य निवडून आला नसल्याने सरपंचपद रिक्त राहिले आहे. तालुक्यातील साराेळा माराेती - सरपंच सविता राजू झुजरके, उपसरपंच निवृत्ती श्रीकृष्ण व्यवहारे, साराेळापीर - सरपंच वैशाली महादेव तायडे, उपसरपंच विनाेद परशराम शिंदे, काबरखेड - सरपंच गजानन भगवान मापारी, उपसरपंच अमाेल आनंदसिंग साेनाेने, वडगाव खं. - सरपंच संगीता दयाराम शेळके, उपसरपंच पंढरी काशीराम सुरडकर, पुन्हई -सरपंच रिक्त, उपसरपंच साेपान सुखदेव पानपाटील, धामणगाव बढे - सरपंच कुरेशी जीनत परवीन शेख अलीम, उपसरपंच शाम बाबुराव निमखेडे, सिंदखेड - सरपंच सीमा प्रवीण कदम, उपसरपंच शारदा विलास उजाडे, रिधाेरा खं. - सरपंच अर्चना दीपक कानडजे, उपसरपंच आधारसिंग सुगदेव माेरे, पिंपळगाव देवी - सरपंच शाेभा तेजराव वाघ, उपसरपंच बेबीताई रतन खानंदे, राेहीणखेड - सरपंच भानुदास संपत हुंबड, उपसरपंच माेहम्मद रफीक शेख करीम, ब्राम्हंदा - सरपंच दीपक भिका गाेरे, उपसरपंच श्रावण त्र्यंबक साेनुने, खेडी - सरपंच ज्याेती नानाजी माेरे, उपसरपंच शीतल रवींद्र दांडगे, पान्हेरा - सरपंच किरण एकनाथ काटकर, उपसरपंच संजय प्रल्हाद वैराळकर, किन्हाेळा - सरपंच पद्माबाई कैलास गवई, उपसरपंच तुषार किसन गारवे, तपाेवन - सरपंच लक्ष्मी किशाेर मख, उपसरपंच सुभाष रतन गायकवाड, कुऱ्हा - सरपंच वर्षा याेगेश घाेती, सरपंच चंद्रकला दलसिंग डांगे, दाभा - सरपंच सरला रवींद्र हागे, उपसरपंच स्वप्नील कैलास हुंबड यांची निवड करण्यात आली आहे.
माेताळा तालुक्यात १२ सरपंच अविराेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:37 AM