लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : तालुक्यातील तांबोळा येथील १२ वर्षीय बालाजी दिपक खरात याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान उघडकीस आली. लोणार तालुक्यातील तांबोळा येथील १२ वर्षीय बालाजी दिपक खरात हा ३१ डिसेंबर रोजी आई, वडिलांसोबत शेतात गेला होता. बालाजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पाणी पिण्यासाठी जातो म्हणून गेला. पंरतु लवकर परत न आल्याने त्याची शोधाशोध केली असता तो आढळून आला नाही. दरम्यान तांबोळा शिवारात असलेल्या विहिरीतील पाण्यावर चपला तरंगत असल्याचे दिसून आल्याने विहिरीत शोध घेतला असता बालाजी खरातचा मृतदेह सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान आढळून आला. लोणार याप्रकरणी पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.कॉ.गजानन तायडे, प्रदिप सोनुने करीत आहेत.
लोणार तालुक्यातील तांबोळा येथे १२ वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 7:48 PM
लोणार : तालुक्यातील तांबोळा येथील १२ वर्षीय बालाजी दिपक खरात याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान उघडकीस आली.
ठळक मुद्देरविवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान उघडकीस आली घटनामृत पावलेल्या मुलाचे नाव दिपक खरात