जिल्ह्यात बारावीतील एकूण विद्यार्थी - ३२,१०८
मुले - १७,७००
मुली - १४,४०८
बारावीनंतरच्या संधी
- बारावीनंतर विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य आणि विज्ञान पदवीसोबतच अनेक संधी आहेत.
- बी.एस्सी., एम.एस्सी. करून संशोधनाकडे वळता येईल. त्यासाठी अनेक शिष्यवृत्तीही दिल्या जातात. इस्रो, बीएआरसी अशा संस्थांमध्ये संशोधनाला भरपूर वाव आहे.
- कॉमर्समध्ये बारावीनंतर विविध स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम शिकविले जातात. त्यात बँकिंग अँड इन्शुरन्स, अकाऊंटस अँड फायनान्स फायनान्शिअल मार्केटस, आदींचा समावेश होतो.
- राज्यशास्त्र, सामाजिकशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, आदी विषय घेऊन आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना त्यात स्पेशलायझेशन करता येते. यूपीएससी, एमपीएससी अशा सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षा देण्यासाठी हे विषय उपयुक्त ठरतात.
विद्यार्थी म्हणतात...
परीक्षा घेतली असती, तर चांगले झाले असते; पण वाढत्या कोरोनामुळे सरकारने परीक्षा रद्दचा घेतलेला निर्णय योग्य वाटतो. आमच्या मूल्यमापनाचे सूत्र लवकर जाहीर करून प्रक्रिया पूर्ण व्हावी.
- उदय इंगळे.
- वर्षभर आभ्यास केला होता; पण कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर पडली. जून महिना आला तरी परीक्षा होत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ती आता दूर झाली.
- अश्विनी भालेराव.
--पालक म्हणतात...--
पूर्वपरीक्षा हीच अंतिम परीक्षा म्हणून घेतली असती तर बरे असते. करिअरच्या दृष्टीने बारावीचे वर्ष महत्त्वाचे असते. परीक्षा घेण्यासाठी आणखी थोडे दिवस थांबण्यास हरकत नव्हती.
- सुभाष मुळे.
परीक्षा रद्द झाल्याने वर्षभर अभ्यास करणाऱ्या हुशार, गुणवंत विद्यार्थ्यांवर एकप्रकारे अन्याय होणार आहे. ऑनलाईन परीक्षा घेता आली असती. आता सरकारने परीक्षा र॒द्दचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन योग्य पद्धतीने व्हावे.
- सुरेंद्र भालेराव.