उध्दव फंगाळ । लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: तालुक्यातील ५0 ग्रामपंचायतींच्या निवडणुकासाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यामध्ये ५0 ग्रामपंचायतीं पैकी ३ ग्रा.पं. हय़ा संपूर्णपणे अविरोध झाल्या आहेत. तर तीन गावचे केवळ सरपंच अविरोध व एकूण १३४ ग्रा.पं. सदस्य अविरोध झाले आहेत. आता ४४ ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी १३५ उमेदवार हे सरपंच पदासाठी तर सदस्य पदासाठी २९0 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक विभाग व पोलीस विभाग सज्ज झाला आहे. ग्रा.पं.च्या पहिल्या टप्प्यात मेहकर तालुक्यात असलेल्या ९८ ग्रामपंचायतींपैकी ५0 ग्रा.पं.च्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी १५ सप्टेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यावेळेस सरपंच पद हे जनतेमधून मतदान होऊन निवडून द्यायचे असल्याने प्रत्येक गावात आजी-माजी ग्रा.पं. पदाधिकारी तर काही गावात रथीमहारथी निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला महत्त्व दिल्या जात नसले तरी पण विविध पक्षांचे नेते प्रत्येक गावच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. ग्रा.पं.ची निवडणूक अनेक ठिकाणी चुरशीची आहे.
सहा सरपंच तर १३४ सदस्य अविरोधमेहकर तालुक्यातील ग्रा.पं.च्या निवडणुकीमध्ये ३ ग्रा.पं.मध्ये वागदेव, बाभुळखेड व वडगाव माळी या ठिकाणी सरपंचासह सर्व सदस्य अविरोध निवडून आले आहेत. तर द्रुगबोरी, नायगाव देशमुख, वरदडा या गावचे केवळ सरपंच अविरोध झाले आहेत. तर ५0 ग्रा.पं.च्या ४२४ सदस्यापैकी १३४ सदस्य हे अविरोध निवडून आले असून, आता ४४ सरपंच पदासाठी १३५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
मतदानासाठी १४१ बुथहोऊ घातलेल्या ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी १४१ बुथ लावण्यात येणार आहेत. तर जवळपास ६00 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३0 ते ५.३0 पर्यंंत मतदान होणार असून, निवडणूक निरीक्षक म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार तर निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार संतोष काकडे हे काम पाहत आहेत.
वागदेव सरपंच, सदस्यांचा भाजपकडून सत्कार तर दुसर्या दिवशी शिवसेनेत दाखलमेहकर तालुक्यातील वागदेव येथील ग्रा.पं. निवडणुकीत सरपंच व सदस्य हे अविरोध निवडून आले आहेत. तर वागदेव येथील सरपंच व सदस्यांचा भाजपकडून सत्कार करण्यात आला. तर दुसर्याच दिवशी हे सरपंच व सदस्य हे शिवसेनेत दाखल होऊन खा. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या घडामोडीची मेहकर तालुक्यात चांगलीच चर्चा सुरू आहे. शिवसेना पक्ष खा. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २५ ते ३0 वर्षांपासून मेहकर तालुक्यात कार्य करीत आहे. शिवसेनेची पाळेमुळे प्रत्येक खेड्यात पोहचली आहेत. शिवसेनेची मजबूत पकड ग्रामीण भागात आहे. तर याउलट भाजपची परिस्थिती दयनीय आहे. भाजपमध्ये मेहकर शहर व तालुक्यात केवळ नेते, पदाधिकारी यांचाच थोडाफार भरणा आहे. भाजपने केवळ श्रेय घेण्यासाठी वागदेव येथील अविरोध सरपंच व सदस्यांचा सत्कार करून घेतला; मात्र एकाच दिवसात हा प्रकार उघड झाला व दुसर्याच दिवशी ही मंडळी शिवसेनेत दाखल झाली. या घडामोडीची मेहकरमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे.