एमडीआर १०४ (साखळी बु.), हतेडी बु. ७ कि.मीसाठी ५१६.५८ लक्ष रूपयांचा रस्ता अंशत: चिखली विधानसभामतदारसंघात असून त्याला ही मान्यता मिळाली आहे. साखळी हतेडी या नवीन ७ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ५ कोटी ५८ लक्ष रूपये मंजूर झाले आहेत. तोरणवाडा, महोदरी, मेडसिंगा, ढुमा, मालगणी सावरगाव डुकरे भोगावती, शेलुद, वळती, हातणी हे नवीन रस्ते असून त्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी निधी उपलब्ध झाल्याने लवकर निविदा प्रक्रिया होऊन रस्ते कामास सुरुवात होणार आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत निकषात बसणाऱ्या रस्त्यांची यादी तयार करून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन रस्त्यांच्या विकासासाठी आमदार श्वेता महाले यांनी निधीची मागणी केली होती. त्यानुषंगाने रस्त्यांना प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत केंद्र शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती आ.श्वेता महाले यांच्या कार्यालयातून देण्यात आली. चिखली विधानसभा मतदारसंघातील इतरही अनेक रस्ते आ.महाले यांनी रस्ते विकास योजनेअंतर्गत समाविष्ट केलेली आहे; त्या रस्त्यांना सुद्धा लवकरच मान्यता मिळण्याची अपेक्षा आमदार श्वेता महाले यांनी व्यक्त केली.
साखळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करा !
साखळी बु. हे सुमारे १० हजार लोकसंख्येचे गाव वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असल्याने ते साखळीवासीयांसाठी गैरसोयीचे होते. त्यामुळे साखळी येथेच प्राथमिक आरोग्य केंद्रास मान्यता देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, कोविड प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वरवंड येथे लसीकरण सुरु आहे. साखळी, येळगाव, अंत्री तेली या व इतर गावातील नागरिकांना लसीकरणासाठी वरवंड येथे जावे लागत असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळतो. साखळी येथे नियमित कोविशिल्ड लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी आमदार श्वेता महाले यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.