- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तुरीची आवक घटल्याने गत पंधरा दिवसात तुरीच्या भावात तीन हजार रूपयांची वाढ झाली आहे. तुरीला बाजारात ९ हजार रुपए प्रती क्विंटल प्रमाणे भाव मिळत आहे. पंधरा दिवसांपूर्वी तूरीचे भाव सहा हजार रुपए प्रतीक्विंटल होते.गतवर्षी कोरोनामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री केली नव्हती. त्यामुळे तुरीसह अन्य शेतमाल शेतकऱ्यांच्या घरात पडून होता. लॉकडाऊन उघडल्यानंतर शेतकºयांनी शेतमालाची विक्री केली. त्यामुळे यावर्षी खरीप हंगाम सुरू असतानाही शेतमालाची विक्री करण्यात आली. तसेच तुरीचीही उशीरापर्यंत विक्री करण्यात आली. मात्र आता गत काही दिवसांपासून तुरीची आवक घटली आहे. यावर्षी शेतकºयांनी तुरीची पेरणी केली असून, डिसेंबर- जानेवारी महिन्यामध्ये तूर विक्रीसाठी येणार आहे. बाजारात तूर विक्रीसाठी येत नसल्याने गत पंधरा दिवसात तुरीच्या भावात तब्बल तीन हजार रूपयांनी वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी तूरीचे भाव सहा हजार रुपए प्रतीक्विंटल होते. त्यामध्ये आता वाढ होऊन नऊ हजार रुपए प्रती क्विंटल झाले आहे. चार ते पाच दिवसांआधी तुरीचे भाव आठ हजार रुपए प्रती क्विंटल होते. तुरीचे हमीभाव शासनाने सहा हजार रुपए जाहीर केले आहे. हमीभावापेक्षा तीन हजार रुपए जास्त भाव सध्या बाजारात तुरीला मिळत आहे. यावर्षी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबिन, कपाशी, मूग व उडिदासह तुरीचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी तुरीच्या उत्पादनही घट येण्याची शक्यता आहे. तूर डिसेंबर - जानेवारी महिन्यामध्ये बाजारात येणार आहे. त्यामुळे तोपर्यंत तुरीच्या भावातील चढ उतार कसा राहील याकडे तूर उत्पादक शेतकºयांचे लक्ष लागले आहे.