बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र असतानाच काही दिवसांपासून रुग्ण वाढत आहेत़ साेमवारी १५ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे़ तसेच नऊजणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ जिल्ह्यात सध्या ८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत़
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३९९ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३९० अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ०९ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील नऊ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील २७२, तर रॅपिड टेस्टमधील ११८ अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहर चिंचोले चौक १, खामगाव शहर २, मेहकर तालुका दुधा १, हिवरा १, नांदुरा शहर १, लोणार तालुका मारोती पेठ १, ब्राह्मण चिकना १, लोणार शहरातील एकाचा समावेश आहे़
६७३ बाधितांचा झाला मृत्यू
आजपर्यंत ६ लाख ९८ हजार २३५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ आज रोजी ८५० नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण ८७ हजार ४८४ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी ८६ हजार ७२७ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोविडचे ८४ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत ६७३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.