लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: एका ट्रकमधून अवैधरीत्या गायींची वाहतूक करणार्या १५ जणांना चिखली पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी अटक केली आहे.अकोला जिल्हय़ातील अकोट तालुक्यात असलेल्या दानापूर येथून गोवा येथे ट्रक क्रमांक एम एच ४0-३१३७ मध्ये १0 गायी व २ वासरे नेत असताना येथून जवळच असलेल्या शेलूद येथील काही जागरूक नागरिकांना लक्षात येताच त्यांनी ट्रकची अडवून पोलिसांना माहिती दिल्यानंतर चिखली पोलिसांनी ट्रक व गायींना ताब्यात घेऊन गायींची अवैधरीत्या वाहतूक करणार्या दिलीप समाधान पाचपोहे, पुंडलीक तुकाराम भुते (वय ७५), गंगाधर गजानन खोने (वय २३), गणेश किसनाजी काळंगे (वय ३५), शांताराम शालीकराम गवई (वय ३६), शिवहरी महादेव घुले, शक्ती गणेश विरघट (वय १९), राजेश पांडुरंग घुले (वय ३२), पंजाब पुंडलीकराव भुते (वय ५0), गजानन संमतराव जितकर (वय २५), ज्ञानेश्वर शहादेव तायडे (वय ३९), गोपाल रामदास भुते (वय २४), संजय पुंडलीकराव भुते (वय ३५) सर्व रा. दानापूर व ट्रकचालक इसामोद्दीन अलोद्दीन (वय ५८) व अमजदखा नूर मोहम्मद खा (वय ३५) रा. अकोट या १५ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पीएसआय तानाजी गव्हाणे करीत आहेत.
गायींची अवैध वाहतूक करणार्या १५ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:05 AM
चिखली: एका ट्रकमधून अवैधरीत्या गायींची वाहतूक करणार्या १५ जणांना चिखली पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी अटक केली आहे.
ठळक मुद्देगोव्यात पाठविणार होते गायी चिखली पोलिसांची कारवाई