शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
3
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
4
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
5
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
6
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
9
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
10
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
11
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
12
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
13
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
14
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
15
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
16
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
17
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
18
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
19
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
20
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

बुलडाणा जिल्हय़ात सापडले १६ ब्लॅक स्पॉट; उपाययोजनांसाठी अंदाजपत्रकांचा सोपस्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:50 AM

बुलडाणा : जिल्ह्यात वर्षभरात झालेल्या ६00 अपघातानंतर परिवहन, पोलीस आणि बांधकाम विभागाने केलेल्या पाहणीत अपघातांना कारणीभूत ठरणारे १६ ब्लॅक स्पॉट शोधण्यात यश आले असून, जीओ टॅगिंगद्वारे या अपघातप्रवण स्थळांचे अक्षांश आणि रेखांशही मिळविण्यात आले आहे. दरम्यान, अपघात रोखण्यासाठी या स्थळांवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्गाच्या उपविभागाकडून अंदाजपत्रके मागविण्यात आली आहेत. 

ठळक मुद्दे६00 अपघातानंतर जीओ टॅगिंगद्वारे शोध

नीलेश जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात वर्षभरात झालेल्या ६00 अपघातानंतर परिवहन, पोलीस आणि बांधकाम विभागाने केलेल्या पाहणीत अपघातांना कारणीभूत ठरणारे १६ ब्लॅक स्पॉट शोधण्यात यश आले असून, जीओ टॅगिंगद्वारे या अपघातप्रवण स्थळांचे अक्षांश आणि रेखांशही मिळविण्यात आले आहे. दरम्यान, अपघात रोखण्यासाठी या स्थळांवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्गाच्या उपविभागाकडून अंदाजपत्रके मागविण्यात आली आहेत. जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाच्या २८ ऑक्टोबर २0१५ च्या पत्रकातील नमूद केलेल्या व्याख्येनुसार हे ब्लॅक स्पॉट जीओ टॅगिंगद्वारे शोधण्यात आले आहे. रस्त्याच्या साधारणत: ५00 मीटर लांबीच्या तुकड्यात मागील तीन वर्षात पाच रस्ते अपघात झाले आहेत आणि त्यात व्यक्ती जखमी किंवा मृत झाला आहे, असे ठिकाण किंवा मागील तीन वर्षात रस्ते अपघातामध्ये दहा व्यक्ती मरण पावल्या आहेत, अशा निकषांवर हे स्पॉट ठरविण्यात आले आहेत. आता अपघाताची कारणे शोधून त्याच्या निवारणासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबत प्रभावी हालचालींची गरज आहे. आठ दिवसात रस्ते अपघाताच्या मालिकेत सहा जणांचा बळी व २८ जण जखमी झाल्याच्या पृष्ठभूमीवर माहिती घेतली. हे १६ ब्लॅक स्पॉटचे गुपित समोर आले आहे.रस्त्यांचा वापर करणार्‍यांमध्ये जागरुकता वाढविण्याच्या दृष्टीने खासदारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीच्या २२ जानेवारीच्या झालेल्या बैठकीत अनुषंगिक विषय छेडताना हा संपूर्ण गोषवारा मांडण्यात आला. शोधण्यात आलेले हे १६ ही ब्लॅक स्पॉट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा, राज्य महामार्ग क्रमांक १७३, प्रमुख राज्य मार्ग क्रमांक १२ आणि २७ वर सापडले आहेत. या १६ अपघात प्रवण स्थळांवर गत काळात ७२ अपघातांमध्ये ९४ लोकांचा बळी गेला असून, ८0 व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाल्या असून, २४२ व्यक्तींनाही अपघाताचा फटका बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशभर ऑक्टोबर महिन्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत असे ब्लॅक स्पॉट शोधण्यात आले आहेत. दरम्यान, स्थानिक भौगोलिक स्थितीमुळे अपघाताची कारणे वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे  अपघाताच्या कारणांचा अभ्यास करून त्याच्या निराकरणासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समिती गरज पडल्यास राष्ट्रीय किंवा राज्य सुरक्षा परिषदेलाही त्याबाबत सल्ला देऊ शकते, अशा सूचना आहेत. प्रामुख्याने ७५ टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे झाल्याचे निदर्शनास येते.

हे आहेत ब्लॅक स्पॉटबुलडाणा बांधकाम विभागांतर्गत प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक १२ वर सावरगाव, सावखेड तेजन फाटा, मोती तलाव, राहेरी बुद्रूक (सिंदखेड राजा परिसर), राष्ट्रीय महामार्ग (अकोला बांधकाम विभाग) अंचरवाडी (देऊळगाव राजा), महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (बुलडाणांतर्गत) मेहकर तालुक्यातील बरटाळा फाटा, कॅनल पूल, नागझरी फाटा आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अमरावती अंतर्गत येत असलेल्या एनएच ६ वरील वाडी पेट्रोलपंप (मलकापूर), तरोडा फाटा, कोलारी फाटा, टेंभूर्णा फाटा (खामगाव ग्रामीण आणि खामगाव सीटी), आमसरी फाटा, चिखली (जलंब) तथा नागपूर-औरंगाबाद मार्गावरील मेहकर तालुक्यातील चांगाडी ब्रीज हे १६ ब्लॅक स्पॉट जीओ टॅगिंकद्वारे शोधण्यात आले आहे.

अपघाताची कारणे१६ ही अपघातप्रवण स्थळी तीव्र वळण, टी पॉईंटवर गतिरोधक नसणे, तीव्र उताराचे वळण, अरुंद रस्ता, वळण आणि अरुंद रस्ता, तीव्र उतार तथा अरुंद रस्ता, तीव्र उतार आणि वळण, अरुंद रस्ता, टी पॉईंट अरुंद असणे, खामगाव शहर परिसरात वाहनांची वर्दळ आणि गर्दी ही वारंवार अपघात घडण्याची कारणे स्थळ पाहणीत समोर आली असल्याचे कागदपत्रामध्ये नमूद आहे. अशा सर्व ठिकाणी अपघातप्रवण स्थळाचे फलक लावणे, गतिरोधक उभारणे अशा उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या १६ स्थळांपैकी आठ स्थळांच्या दुरुस्तीबाबतच्या कामकाजाची मंजुरी प्राप्त झाली असून, बुलडाणा येथील कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता व राष्ट्रीय महामार्गच्या खामगाव येथील उपविभागीय अभियंत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. बुलडाणा विभागांतर्गत  २0९ किमीचे रस्ते हायब्रीड अँन्युटींतर्गत होत असून, त्यात या अपघात प्रवण स्थळांवर उपाययोजना करण्यासाठी तरतूद करण्यात आली.

 प्रत्यक्ष जीओ टॅगिंग करून हे १६ ब्लॅक स्पॉट निश्‍चित करण्यात आले आहेत. ऑक्टोबर महिन्यात परिवहन, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अपघातप्रवण स्थळांचे अक्षांश आणि रेखांश मिळवले आहेत. संपूर्ण देशपातळीवरच ही मोहीम राबविली जात आहे.- पी. के. तडवी, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा