बुलडाणा : जिल्ह्यात ९२0 अंगणवाड्यांना स्वमालकीची इमारत असून, २५९ अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत चालतात, तर १६५७ अंगणवाड्यांच्या अद्यापही स्वतंत्र इमारती बांधल्या गेल्या नाहीत. त्यामुळे अंगणवाडीमधील चिमुकल्यांना ग्रामपंचायत किंवा मंदिराच्या ओट्यावर धडे गिरवावे लागत आहेत.जिल्ह्यात सर्वच अंगणवाड्यांच्या इमारती बांधकामासाठी मंजूर असताना १६५७ अंगणवाड्यांना अद्यापही स्वतंत्र इमारती बांधल्या नाहीत, त्यामुळे या अंगणवाडीतील बालकांना कुठे जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांमध्ये तर कुठे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये रिकाम्या खोल्यांमध्ये धडे घ्यावे लागत आहेत. बर्याच अंगणवाड्यांच्या विद्यार्थ्यांंच्या डोक्यावर छतच नाही. या अंगणवाड्या चक्क उघड्यावर भरतात. जिल्ह्यात २७९८ अंगणवाड्या असून, यापैकी २५९ अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत चालविल्या जातात. त्यामुळे अंगणवाडी केंद्रातील शेकडो विद्यार्थी कुठे ग्रामपंचायत कार्यालयात तर कुठे समाज मंदिरात भरविल्या जातात. याशिवाय ९८ इमारतीमध्ये शौचालय नाही. शाळा, समाजमंदिर व इतरत्र भरणार्या अंगणवाड्यांच्या बालकांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत, अशी बाब जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचनातून पुढे आली आहे, त्यामुळे अंगणवाड्यांच्या प्रगतीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
१६५७ अंगणवाड्या इमारतीविना
By admin | Published: February 12, 2016 2:09 AM