शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी निधी केला जाहीर; सरकारी जीआर जारी
4
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
5
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
6
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
7
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
8
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
9
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
10
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
11
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
12
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
13
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
14
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
15
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
16
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
18
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
19
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित

घरफोडीत १.७८ लाखांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 12:50 PM

Crime News पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. शहरातील क्रीडा संकुल परिसरातील गुरुकृपानगरमध्ये एका घरातून अज्ञात चोरट्यांनी १.७८ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २४ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार  पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.बुलडाणा शहरात गेल्या १५ ते २० दिवसांपासून घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सागवन परिसरात एका घरातून २.५० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे प्रकरण समोर आलले असतानाच पुन्हा घरफोडी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.    शहरात यापूर्वीही एका पोलीस कर्मचाऱ्याच्या दुकाचीवरील पिशवीतून दोन लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. या तीन घटना पाहता जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दरम्यान, गुरुकृपानगरमध्ये राहणारे अजय सुभाष भोपळे यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यामध्ये ४० हजारांची सोन्याची पोत, ५० हजार रुपये किमतीचा सोन्याचा गोफ, ४५ हजा रुपयांच्या अंगठ्या व अन्य दागिने असा माल लंपास केला आहे. भोपळे यांच्या घर फोडून अज्ञात चोरट्यांनी दागिने लंपास केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव हे पुढील तपास करत आहेत. चोऱ्यांचा छडा लावण्याचे आव्हान निर्माण झाले          आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी