शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

भाडेपट्ट्याची १८ कोटींची थकबाकी नगर परिषदेला मिळणार, बिर्ला इन्फ्रास्ट्रक्चरला उच्च न्यायालयाचा आदेश

By अनिल गवई | Published: January 12, 2024 8:52 PM

ही रक्कम भाडेपट्टाधारक बिर्ला इन्फ्रास्ट्रक्चरला आता भरावी लागणार आहे.

खामगाव : शहराच्या मध्यवर्ती भागातील नगरपालिकेच्या मालकीच्या सात हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या जमिनीच्या भाडेपट्ट्याच्या करारानुसार थकीत भाड्याची १८ कोटी रुपये रक्कम चार आठवड्यांत न्यायालयात जमा करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ९ जानेवारी रोजी दिला. ही रक्कम भाडेपट्टाधारक बिर्ला इन्फ्रास्ट्रक्चरला आता भरावी लागणार आहे.

नगरपालिकेच्या शीट नंबर ४१-अ भूमापन क्रमांक १५ आणि १६ नझुल शीट नं ४१-सी भूमापन क्रमांक ४ क्षेत्रफळ ७.५९८७ हेक्टर जागा नगर परिषदेने १९७३ मध्ये भाडेपट्ट्याने दिली होती. त्याबाबत खामगाव नगरपालिका आणि बिर्ला इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांच्यामध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रकरण सुरू आहे. त्या खासगी संस्थेने सन १९७३ ते २००३ दरम्यानच्या काळासाठी केलेल्या करारनाम्यातील शर्ती व अटींचे उल्लंघन करून भाडे थकीत ठेवले. मालमत्तेवरील थकीत भाड्याचा भरणा नगर परिषदेकडे केला नाही. 

तसेच याच कालावधी भाडेपट्ट्याची मुदत संपल्याने या मालमत्तेचे नगर परिषदेकडे हस्तांतरण करणे आवश्यक आहे. ते हस्तांतरणही वैधरित्या झाले नाही. नगरपालिका प्रशासनाने संबंधित जागेच्या भाडेपट्ट्यापोटी १८ कोटी ०७ लाख ३१ हजार ५६९ रुपयांच्या भरण्यासाठी तसेच जागेचा ताबा हस्तांतरित करण्यासाठी नगरपालिकेने संबंधितांना ८ जानेवारी रोजी नोटीस बजावली होती. दरम्यान, शहरातील मोक्याच्या असलेल्या या जागेकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. न्यायालयाच्या आदेशाने शहरातील काही भूमाफियांचे स्वप्न भंगल्याची चर्चा पालिका वर्तुळात होत आहे.

चार आठवड्यांची मुदतया प्रकरणी पालिकेची नोटीस मिळाल्यानंतर बिर्ला इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले. यावेळी सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याने भाडेपट्टा जमा करण्याचे निवेदन उच्च न्यायालयाने स्वीकारले. तसेच भाडेपट्ट्याची रक्कम चार आठवड्यांत भरण्याचा आदेश न्या. नितीन सांबरे आणि न्या. अभय मंत्री यांनी दिला.

भाडेपट्टा नूतनीकरणास पालिकेचा विरोध१९७३ साली नगरपालिकेने ही जागा औद्योगिक कारणासाठी भाडेपट्ट्याने दिली होती. मात्र, सद्यस्थितीत या जागेवर कोणताही उद्योग सुरू नाही. शहराच्या आर्थिक, सामाजिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून भाडेपट्टा नूतनीकरणाला पालिकेचा विरोध आहे. मध्यवर्ती ठिकाणची ही जागा पडिक असल्याचेही पालिकेने म्हटले आहे. 

टॅग्स :khamgaonखामगाव