लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संक्रमणाची वाढती व्याप्ती पाहता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना बुलडाणा पालिकेच्या पथकाने गेल्या सात दिवसात १८ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान मास्क न लावणे, संचारंदीचे उल्लंघन आणि शारीरिक अंतराचे पालन न केल्या प्रकरणीही गेल्या आठ दिवसात मोठ्या प्रमाणावर दंड आकारण्यात आला आहे.एरेवी रस्त्यावर थुंकणाºयांकडे फारसे गांभिर्याने कोणी पाहत नव्हते. मात्र कोरोना संक्रमणाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºयांवर जुन्या कायद्याचा आधार घेत आता थेट कारवाई करण्यात येत आहे. अशा व्यक्तींकडून गेल्या सात दिवसात बुलडाणा पालिकेने १८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, तोंडाला मास्क न लावता फिरणाºयांवरही पालिकेने शहर परिसरात कारवाईचा बडगा उचलला असून अशांना ४३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पालिकेचे पथक सध्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सक्रीय झाले असून नियमांचे उल्लंघन करणाºयांवर थेट कारवाई करत आहे सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºयांवर करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना १८ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 12:10 PM