जिल्ह्यातच नाहीतर राज्यभरातील शाळांमध्ये गॅस कनेक्शनची परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात सारखी आहे. त्यामुळे या शाळांना गॅस सिलिंडर दिले, तर या शाळांची चुलीच्या धुरातून मुक्तता होईल. त्यामुळे शाळेत गॅस जोडणीची मागणी अनेक दिवसांपासून शाळा व्यवस्थापन समितीकडून होत होती. त्यानुसार जिल्ह्यात गॅस जोडणी नसलेल्या शाळांची यादी शासनाकडे पाठविण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सर्वच प्राथमिक शाळांमध्ये गॅसचे कनेक्शन लावण्यात येणार आहे. गॅस कनेक्शन लावण्यासाठी अजून निधी उपलब्ध झाला नसला तरीही जर ही सोय झाली तर शालेय पोषण आहार शिजवून देणे सुकर होणार आहे.
जिल्ह्यातील १८६५ शाळा सोडल्यास जिल्ह्यातील उर्वरित सर्वच शाळांमध्ये गॅस कनेक्शन आहे. त्या माध्यमातून अन्न शिजवून मुलांना वाटप होते. परंतू गेल्या वर्शभरापासून कोरोनामुळे शाळेत अन्न शिजवून न देता थे पालकांकडे धान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यातील गॅस जोडणी नसलेल्या शाळांसाठीच्या गॅस कनेक्शनसंदर्भातील प्रस्ताव हा शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.
- सचिन जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.
वर्षभरापासून शिजला नाही पोषण आहार
कोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून शाळेत पोषण आहार शिजला नाही. पालकांना शाळेत बालावून त्यांच्याकडे पोषण आहाराचे धान्य वाटप करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील एकूण शाळा - १९९७
गॅस नसलेल्या शाळा - १८६५