शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी १९६ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 11:34 AM

जिल्ह्यात एकूण बाधीत रुग्णांची संख्या ४,१९१ झाली असून मंगळवारी एकाचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतकांची संख्या ५९ झाली आहे.

बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत असून मंगळवारी तब्बल १९६ जण बाधीत निघाले. आजपर्यंतचा बुलडाणा जिल्ह्यातील एक विक्रमच म्हणावा लागेल. दरम्यान, जिल्ह्यात एकूण बाधीत रुग्णांची संख्या ४,१९१ झाली असून मंगळवारी एकाचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतकांची संख्या ५९ झाली आहे.जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचा वेग दीडपटीने वाढविण्यात आला असून बाधीतांची संख्याही त्या तुलनेत  वाढत आहे. प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपीड टेस्ट असे मिळून ७०८ संदिग्ध रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ५१२ जणांचा ्हवाल निगेटीव्ह आला तर १९६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात १५६ अहवाल प्रयोगशाळेतून तर रॅपीड टेस्टमध्ये ४० जण पा२झिटिव्ह आले.यामध्ये खामगावमध्ये ३१, शिर्ला नेमाने व शेलोडी येथे प्रत्येकी एक, देऊळगाव राजा  १४, निमगांव गुरू  १६, देऊळगाव मही, पाच, मेंडगाव एक, बुलडाणा १४, कोलवड एक,  चिखली दोन, देऊळगाव घुबे एक, मेरा बुद्रूक एक, किन्होळा वाडी दोन, मलकापूर १३, शिराढोण एक, विवरा सहा, मोरखेड एक, मेहकर सहा, डोणगाव एक, बोरी दोन, जानेफळ चार, बोराखेडी एक, धामणगाव बढे एक, इब्राहीमपूर एक, मोताळा दोन, बिबी दोन, शिवणी पिसा १४, नांदुरा पाच, वडनेर भोलजी दोन, नांदुरा दोन, जळगाव जामोद चार, वडशिंगी सात, खेर्डा चार, जामोद एक, वाडी खुर्द एक, आगेफळ एक, मोहाडी सवडत पाच, दरेगांव एक, झोटींगा एक,  साखरखेर्डा एक, सिंदखेड राजा पाच, शेगाव दहा, संग्रामपूर एक या प्रमाणे कोरोना बाधीत आढळून आले. दरम्यान, धाड येथील एका ६५ वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे आठ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतकांची संख्या ५९ झाली आहे.दरम्यान, जिल्ह्यातील २० हजार ९४१ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान, ३,००८ बाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप १,३३७ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात बाधीतांची संख्या ४,१९१ झाली आहे पैकी १,१२४ जणांवर सध्या उपचार करण्यात येत आहे. ५९ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

१२५ रुग्णांची कोरोनावर मातएकीकडे १९६ कोराना बाधीत आढळून आले असतानाच १२५ जणांनी कोरोनावर मात केल्याचा दिलासाही जिल्ह्याला मिळाला आहे. यामध्ये देऊळगाव राजा चार,  धोत्रा नंदई एक, शेगाव दोन, भोनगाव एक, माटरगाव एक, नांदुरा नऊ, निमगाव तीन, माळेगाव गोंड एक, मलकापूर चार खामगाव २५, चिखली चार,  शेलगाव ज. एक, सोयंदेव एक, उमरद दोन, किनगाव राजा दोन, वाघाळा दोन, साखरखेर्डा एक, सिंदखेड राजा तीन, मेहकर तीन,  डोणगाव १३, खेडी दोन, बुलडाणा १४, सव एक, सावळा एक, कासारखेड एक, लोणार १३, जळगाव जामोद चार, पिंपळगाव काळे पाच, खेर्डा खुर्द एक, सोनाळा एक या प्रमाणे बाधीतांनी कोरोनावर मात केली. दरम्यान जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यात येत असलेल्या वडाळा येथील एकाचाही यात समावेश आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या