नांदुरा (जि. बुलडाणा) : नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत २३ एप्रिल या अर्ज भरण्याचे शेवटचे तारखेपर्यंंत १९७ अर्ज संध्याकाळपर्यंंत दाखल करण्यात आले. १८ जागांसाठी ही निवडणूक होऊ घातली आहे. यामध्ये प्रामुख्याने सभापती विलास पाटीलसह विद्यमान संचालक बंटी फणसे, बलदेवराव चोपडे, राजरत्न तायडे, विजयसिंग राजपूत, शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब धोरण यांचे भाऊ भगवान धोरण, वसंतराव भोजने, डॉ.प्रदीप हेलगे, रामभाऊ झांबरे, न.प.उपाध्यक्ष अनिल सपकाळ, नगरसेविका कोकीळाबाई झांबरे, मनोज राठी यांच्यासह सर्व विद्यमान संचालकांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सेवा सहकारी मतदार संघामध्ये सर्वसाधारण ७५ अर्ज, महिला मतदार संघ १४, इतर मागासवर्गीय १७, भटक्या विमुक्त जाती ६, ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण ३३, अनु.जाती जमाती-१७, दुर्बल घटक-११, व्यापारी मतदार संघ- १७, हमाल मापारी-७ असे एकूण १९७ उमेदवारांनी आज शेवटच्या दिवसापर्यंंत अर्ज दाखल केले. उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख ८ मे आहे.
कृउबास निवडणुकीत १९७ उमेदवारांचे अर्ज
By admin | Published: April 24, 2015 1:31 AM