शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

दिवाळीत बाजारपेठेत २0 कोटींची उलाढाल

By admin | Published: November 01, 2016 12:20 AM

दुचाकी वाहन, सोने खरेदी वाढली; कपडा व ईलेक्ट्रॉनिक वस्तुलाही मागणी.

बुलडाणा, दि. ३१- दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट असताना यावर्षी शेवटच्या तिन दिवसात दिवाळीच्या खरेदीमध्ये वाढ होऊन यंदाही दिवाळीत कोटीचा धमाका झाल.ा. एकट्या बुलडाणा शहरात तीन दिवसात २0 कोटीची खरेदी झाली. यामध्ये दुचाकी वाहन, सोनेचांदी व कपड्या बरोबरच ईलेक्ट्रॉनीक क्षेत्रातही मोठी उलाढाल झाली. यंदाच्या दिवाळीत एलईडी टीव्ही, फ्रीज यांना सर्वाधिक मागणी होती. दुचाकी वाहनामध्ये एका शोरूम मध्ये तीन दिवसात १२00 वाहनाची विक्री झाली तर, शहरातील दुसर्‍या एका शोरूम मध्ये ३00 वाहने विकल्या गेली. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळीचा सण आल्यामुळे तसेच अनेक कर्मचार्‍यांना बोनस व पगार मिळाल्यामुळे कर्मचार्‍यांनी दिवाळीची खरेदी मोकळ्या हाताने केली. यावर्षी परतीच्या पावसामुळे सोयाबीन व कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिकाचे उत्पन्नात घट झाली. त्यामुळे काही भागात दुष्काळाचे सावट ेअसल्यामुळे यावर्षी दिवाळीची खरेदी फार राहणार नाही असा व्यापार्‍यांचा अंदाज होता. दिवाळीच्या तीन दिवस आधी पर्यंत मार्केटमध्ये शुकशुकाट होता. रविवार २३ ऑक्टोबर रोजी दिपावली पूर्व बाजारात गर्दी कमी दिसून आली. मात्र ३0 ऑक्टोबर रोजी लक्ष्मी पूजन असल्यामुळे तीन दिवसापासून बाजारात मोठी गर्दी दिसून आली. तसेच प्रारंभी तीन दिवस फटाका बाजारात शुकशुकाट होता. मात्र धनतेरस व लक्ष्मीपुजनच्या दिवशी फटाक्याची खरेदी वाढल्याचे व्यापार्‍यांनी सांगीतले.