लोकमत न्यूज नेटवर्क
पातुर्डा : काश्मिर मधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे दहशतवाद्यांशी लढताना पातर्ड्यातील चंद्रकांत भगवंतराव भाकरे हा जवान शहीद झाला.वृत्त पोहचताच गावात सर्वत्र शोककळा पसरली. अंत्यसंस्कार सोमवारी सकाळी होण्याची शक्यता आहे. १९ रोजी सकाळी संबंधीत अधिकारी वर्गाने शहीद जवानाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. गावात तगडा पोलिस बंदोबस्त असून तामगावचे ठाणेदार भूषण गावंडे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पातुर्डा विद्युत उपकेंद्राजवळ बॅरीकेटस लावण्यात येत आहेत. चंद्रकांतला अंतिम विदाई देण्यासाठी गावातील युवाशक्ती स्वयंस्फूर्तीने कामाला लागली आहे. सकाळीच युवकांनी पूर्ण गावाची स्वच्छता केली. शहीद जवानाची गावातून मिरवणूक निघणार आहे. युवकांनी मिरवणुकीचा मार्ग स्वच्छ केला विद्युत उपकेंद्राजवळ शहीद जवानाला चिताग्णी दिला जाईल. रस्त्यालगतच्या शेतात तयारी प्रशासनाकडून सुरु आहे. गावात येणारे सर्व प्रमुख मार्ग बॅरीकेट्स लावून वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. अर्धा ते एक किमी पर्यंत पार्र्किंग ठेवण्यात आली असून पुढे फक्त पायी जाता येणार आहे. दहन स्थळासमोरच व्हीआयपी पार्कींग असून अद्याप कोण कोण हजर राहणार हे निश्चित झाले नाही गावकरी हळव्या मनाने आपल्या लाडक्या वीर जवानाला अखेरचा निरोप देण्याची तयारी करीत आहेत. येथील शहीद जवान चंद्रकांतच्या अंत्यविधीसाठी प्रशासनाचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी येथे हजर झाले आहे.
शहीदच्या अंत्यविधीला वीस लोकांना परवानगी आहे. गावकºयांनी घरुनच पुष्पवृष्टी करावी नातेवाईकांना संधीद्यावी कोरोनाच्या पृष्ठभूमीवर काळजी घ्यावी.
- वैशाली देवकर, एसडीपीओ
शहीदाचे कुटुंबीय मुळगावी हजर! शहीद चंद्रकांत भाकरे यांची पत्नी आई व मुले सद्यस्थितीत पुण्यात तळेगाव सीआरपीएफ कॅम्पमध्ये आहेत ते पातुर्डा गावात पोहचले आहेत शहीद माता व शहीद पत्नी मनिषा, कुश व दिव्या या दोघा मुलांसह पातुर्डा गावी पोहचली आहे शहीद कुटुंबीयांना चंद्रकांत यांच्या मृत्यूची माहिती मिळाली आहे. सीआरपीएफच्या स्पेशल वाहनातून शहीद कुटुंब सुखरुप गावी पोहचले आहेत. (वार्ताहर)