सोनाळा : पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या श्री संत सोनाजी महाराज तीर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीने ११ फेब्रुवारीला ग्रामपंचायतीच्या झालेल्या मासिक सभेत ग्रामपंचायतीच्या अखत्यारितील २0 आर जमीन विकास कामांसाठी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. परिणामी ब वर्ग दर्जा प्राप्त या तीर्थक्षेत्र स्थळाच्या विकासास चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येथील सोनाजी महाराजांची यात्रा प्रसिद्ध आहे. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून या यात्रेसाठी भाविक कार्तिक महिन्यात येथे येत असतात. पुरीच्या जगन्नाथ रथाशी साधम्र्य असलेला रथ येथे भाविक हाताने ओढता. या उत्सवास येथे खूप महत्त्व आहे. त्यामुळे सोनाळा येथील श्री संत सोनाजी महाराज संस्थानला तीर्थक्षेत्राचा ह्यबह्ण दर्जा देण्यात आला आहे. मात्र, येथे विकास कामे करण्यासाठी जागा कमी पडत असल्याने समस्या निर्माण झाली होती. त्यानुषंगाने श्री. संत सोनाजी महाराज विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ विश्वकर्मा यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज देऊन जागेची मागणी केली होती. पाच फेब्रुवारीच्या सभेत यासंदर्भात माहितीही देण्यात आली होती. त्यानुषंगाने ११ फेब्रुवारीला झालेल्या मासिक सभेत या विषयावर चर्चा करण्यात येऊन गट नं. ४९६ मध्ये तीर्थक्षेत्र विकासाची कामे करण्यासाठी २0 आर जमीन शासनाच्या अटी व नियमांच्या अधीन राहून विकास कामासाठी देण्यास परवानगी देण्यात आली आहे. शकुंतला गावंडे या प्रस्तावाच्या सुचक असून, अनुमोदक म्हणून जगन्नाथ विश्वकर्मा हे आहेत.
तीर्थक्षेत्र विकासासाठी २0 आर जागा
By admin | Published: February 13, 2016 2:17 AM