- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: समृद्ध ग्राम स्पर्धेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील २४ गावात मृदा व जलसंधारण, जलव्यवस्थापन व कुटूंबांचे आर्थीक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीकोणातून कार्यक्रम राबविण्यासाठी प्रशिक्षकांची निवड करण्याचे काम सुरु झाले आहे. वॉटर कप नंतर आता २० गावे समृद्ध होणार आहेत. यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मागील ४ वर्षापासून पानी फाउंडेशन पानलोट विकासाची लोकचळवळ राबवित आहे. सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धेनंतर आता पानी फाउंडेशनने समृद्ध ग्राम स्पर्धा सुरु केली आहे. या स्पर्धेसाठी बुलडाणा जिल्हयातील २० गावे समाविष्ट करून घेण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात मोताळा तालुक्यातील १८ ठिकाणच्या शाळांमध्ये ‘निसर्गाची धमाल शाळा’ हा उपक्रम राबवून या गावातील विद्यार्थी व गावकऱ्यांना मृदा व जलसंधारण, जल व्यवस्थापन, वृक्ष आणि जंगलाची लागवड व वाढ करणे, पौष्टीक गवताचे संरक्षीत कुरणक्षेत्र तयार करणे, मातीचे आरोग्य व पोत सुधारणे यावर काम होणार आहे. निसर्गाच्या धमाल शाळेच्या माध्यमातून पानी फाउंडेशनच्या टीमने १८ शाळांमध्ये मजेशीर खेळ, गाणी, चित्रपटांच्या माधअयमातून निसर्ग, पानी, मनुष्य यांचे अतूट नाते या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.स्पर्धेसाठी या गावांची निवडअंत्री, उबाळखेड, उर्हा, कोºहाळा, खामखेड प्र. राजूर, चिंचखेड नाथ, चिंचपूर, जनुना, जयपूर, तिघ्रा, दाबा, पोक्री, पोफळी, भोरटेक, महाळुंगी जहागिर, रिधोरा प्र. मलकापूर, लपाली, वारूळी, शेलापूर खूर्द, सिंदखेड या गावांची समृद्ध ग्राम स्पर्धेसाठी निवड केली आहे.
समृद्ध ग्राम स्पर्धा राबविण्यासाठी प्रशिक्षकांची निवड केली जाणार आहे. संबधित गावातील ५ लोकांना प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. प्रशिक्षीत लोक आपल्या गावात नंतर स्पर्धेच्या दृष्टीने काम करतील.- ब्रम्हदेव गिºहे,जिल्हा समन्वयक, पानी फाउंडेशन, बुलडाणा.