यासोबतच लोणार येथील शासकीय इमारतींचे नूतनीकरण, दुर्गा टेकडी येथे पर्यटक निवास प्रस्तावित आहे. ६१ कोटी रुपयांचा सांडपाणी प्रकल्प लोणार पालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत आहे. यासोबतच ३ कोटी ६३ लाख रुपये खर्चून पिसाळ बाभूळ निष्कासन प्रकल्प विभागीय वनाधिकारी वन्यजीव अकोला यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे.
तसेच परिसराच्या विकासासाठी आवश्यक खाजगी जमीन संपादनासाठीही १५ कोटी रुपये निधी मागणीचा प्रस्ताव आहे. एकूण लोणार सरोवर परिसराचा विकास करण्यासाठी २०५ कोटी १२ लक्ष रुपयांचा विकास आराखडा करण्यात आला असून त्यातून मंजुरी मिळालेल्या व निधी प्राप्त झालेले साडेसात कोटी रुपयांची कामे पूर्णही झाली आहेत.
मुख्यमंत्री रमले आठवणीत
लोणारबाबत बोलताना, मुख्यमंत्र्यांनी ‘हा विषय फार पूर्वीपासून मनात होता’, असे सांगितले. आठवण सांगताना ते म्हणाले की, ‘बऱ्याच वर्षांपूर्वी मी लोणार येथे आलो होतो. येथील मी काढलेले छायाचित्र माझ्या छायाचित्र प्रदर्शनात लावले होते. प्रदर्शन पहायला येणारे लोक हे लोणारच्या छायाचित्रापाशी थबकत. ते याबद्दल कुतूहलाने चौकशी करत. इथं यायचं कसं? थांबायचं कुठं अशी माहिती विचारत. त्या वेळपासूनच ह्या भागाचा विकास पर्यटनाच्या दृष्टीने झाला पाहिजे हे मनात होतं. म्हणूनच आपण आज इथं आलो आहे.’