लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: बुलडाणा जिल्ह्यात प्रथमच विदर्भ पक्षीमित्र संमेलन होत असून लोणार शहरास या संमेलनाचा मान मिळाला आहे. लोणार सरोवराचे संवर्धन व स्वच्छता या कामास प्राधान्य देणारी 'मी लोणारकर' ही या संमेलनाची आयोजक संस्था आहे.यावर्षी फ्लेमिंगो पक्षांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी हे संमेलन होत आहे. या संमेलनाच्या माध्यमातून लोणारमधील पक्षीवैभव, वन्यजीवन, पुरातत्वीय व खगोलीय, भूशास्त्रीय ठेवा यांना उजाळा मिळणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने दोन डिसेंबर रोजी लोणारमध्ये बैठकही आयोजित करण्यात आली होती. त्यास महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, सचीव डॉ. गजानन वाघ, विदर्भ समन्वयक दिलीप वीरखडे, पक्षीमित्र मासिकाचे सहसंपादक किरण मोरे, पक्षीअभ्यासक मिलिंद सावदेकर यांच्यासह संतोष जाधव, अरुण मापारी, विलास जाधव, सचिन कापुरे, डॉ.भास्कर मापारी, जितेंद्र सानप उपस्थित होते. (प्रतिनिधी)
२० वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन फेब्रुवारीत लोणारमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 3:42 PM