लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : तालुका डिसेंबरपर्यंत संपूर्ण हगणदरीमुक्त झाला पाहिजे, अशा सूचना जिल्हा स्तरावरून मेहकर पंचायत समितीच्या संबंधित अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने पं.स. गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी व सभापती यांनी प्रयत्न सुरू केले असून, अद्याप २१ हजार कुटुंबांकडे शौचालयच नाही. त्यामुळे शौचालय बांधकामासंदर्भात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.प्रत्येक गाव हगणदरीमुक्त झाले पाहिजे, यासाठी शासन स्तरावरून वेगवेगळया नावाने योजना राबविण्यात येत आहेत. प्रत्येकाने शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करावा, यासाठी शासनाकडून अनुदानसुद्धा देण्यात येते. गेल्या पाच वर्षांपासून मेहकर तालुका हगणदरीमुक्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधावे, यासाठी पंचायत समितीचे सभापती जया कैलास खंडारे, गटविकास अधिकारी आर.पी. पवार, सहायक गटविकास अधिकारी ए.एस. सानप, तालुका समन्वयक दत्ता मगर हे सतत प्रयत्न करीत आहेत. पं.स.च्या मासिक सभेतही प्रत्येक ग्रामसेवकाला तशा सूचना करण्यात येतात. तालुक्यात जवळपास ४१ हजार ७१६ कुटुंबे असून, १९ हजार ९५० कुटुंबांकडे आज रोजी शौचालय आहे, तर जवळपास २१ हजार ७६६ कुटुंबांकडे अध्यापही शौचालय नाही. डिसेंबरपर्र्यंत मेहकर तालुका हगणदरीमुक्त करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत.दलालापासून सावध राहावे -सानपसध्या ग्रामीण भागात शौचालय बांधकाम करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी प.स.कडून अनुदानसुद्धा देण्यात येते; मात्र काही गावांमध्ये शौचालय बांधकाम व अनुदान मिळवून देण्यासाठी लाभार्थींकडून पैसे उकळण्याचा धंदा सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. शौचालय बांधकाम व अनुदानासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. जर कोणी पैसे मागत असेल, तर थेट पंचायत समितीच्या संबंधित विभागाशी संपर्क करून दलालापासून सावध राहण्याचे आवाहन सहायक गटविकास अधिकारी अशोक सानप यांनी केले आहे.
२१ हजार कुटुंबे शौचालयाविना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 9:05 PM
लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : तालुका डिसेंबरपर्यंत संपूर्ण हगणदरीमुक्त झाला पाहिजे, अशा सूचना जिल्हा स्तरावरून मेहकर पंचायत समितीच्या संबंधित अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने पं.स. गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी व सभापती यांनी प्रयत्न सुरू केले असून, अद्याप २१ हजार कुटुंबांकडे शौचालयच नाही. त्यामुळे शौचालय बांधकामासंदर्भात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती ...
ठळक मुद्देमेहकर तालुका हगणदरीमुक्तीसाठी प्रयत्न सुरूअद्याप २१ हजार कुटुंबांकडे शौचालयच नाही.