लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक आठवडी बाजारातील भाजीपाला साठवणुकीच्या दुकानांना लागलेल्या आगीची झळ २२ दुकानांना बसली आहे. कोरोनाकाळात व्यावसायिकांचे लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेप्रकरणी घातपाताची शक्यता व्यक्त होत आहे.शहराच्या मध्यभागी असलेल्या आठवडी बाजारातील भाजीपाल्याच्या दुकानांना रात्री ७.४५ वाजता आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. अचानक लागलेल्या आगीत तब्बल २२ दुकाने जळून खाक झाली. कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत आधीच व्यवसाय डबघाईस आल्यानंतर आता आगीने या व्यावसायिकांचे होत्याचे नव्हते केले.
अतिक्रमणांमुळे अडथळाआठवडी बाजारात असलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरूंद झालेत. काहींनी लीजवरील जागेत पक्क्या इमारतींचे बांधकाम केले. त्यामुळे शनिवारी रात्री अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला. परिणामी आग विझविण्यास विलंब झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, घटनास्थळी खामगाव अग्निशमन विभागाच्या गाड्यांपूर्वी नांदुरा येथील अग्निशमन विभागाची गाडी दाखल झाल्या.