त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे आता प्राधान्याने लसीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत चार टप्प्यांत लसीकरण मोहीम राबविण्यात आली. प्रथमत: आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी, सहव्याधी असलेले ४५ ते ६० वयोगटातील व्यक्ती त्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती अशा पद्धतीने हा क्रम आहे. तूर्तास १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण डोसच्या तुटवड्याअभावी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वर्तमान स्थितीत जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या १७ हजार ३७० कोविशिल्ड आणि १४०० कोव्हॅक्सिनमधून राहिलेले फ्रंटलाइन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचारी यांचे लसीकरण प्राधान्याने केले जाऊ शकते. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या जिल्ह्यात १८ हजार ७७० लसीचे एकूण डोस उपलब्ध असून आगामी तीन दिवस ते पुरू शकतात. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ४२ हजार ९७६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात २३ हजार ६९७ फ्रंटलाइन वर्कर्स आहे. त्यापैकी ६६ टक्के कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. फ्रंटलाइन वर्कर्सची संख्या २३,९६८ असून या सर्वांनीही लसीचा पहिला डोस घेतला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी ७५९८ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे तर फ्रंटलाइन वर्कर्सपैकी ३९ टक्के अर्थात ९४५९ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
-३३ टक्के आरोग्य कर्मचारी बाकी--
जिल्ह्यातील २३ हजार ९६७ आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ८ हजार ५३ अर्थात ३३ टक्के कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिलाच डोस घेतलेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने करणे गरजेचे झाले आहे. सहव्याधीसह अन्य काही कारणामुळे या कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली नाही.
--किती लसीकरण?--
हेल्थ वर्कर्स:- १) पहिला डोस घेणारे:- १५,६४४, २) दुसरा डोस घेणारे:- ७,५९८
फ्रंटलाइन वर्कर्स:- १) पहिला डोस घेणारे:- २४६९६, २) दुसरा डोस घेणारे:- ९४५९