शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

बुलडाणा जिलह्यातील २२३ संदिग्ध कोरोनो रुग्ण ‘क्वारंटिन’मधून मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 11:08 AM

२२३ जणांना आजपर्यंत संबंधीत कक्षातून आरोग्य विभागाने सुटी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्ग झाल्याच्या संशयावरून गेल्या एक महिन्यात होम क्वारंटीन, हॉस्पीटल क्वारंटीन आणि आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या जिल्ह्यातील २२३ जणांना आजपर्यंत संबंधीत कक्षातून आरोग्य विभागाने सुटी दिली आहे.एकीकडे बुलडाणा जिल्ह्यातील सात तालुक्यात तब्बल १७ कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली असताना गेल्या महिनाभराचा आढावा घेतला असता ही बाब समोर आली आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याच्या दृष्टीने ही दिलासा व समुह संक्रमणाचा धोका कमी होण्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे. २८ एप्रिल रोजी कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रथमत: बुलडाण्यातच चार रुग्ण आढळून आले होते तर टप्प्या टप्प्याने चिखली, देऊळगाव राजा, चितोडा, सिंदखेड राजा, शेगाव आणि मलकापूर येथे कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून आले होते.

जिल्ह्यातील दोन टक्के लोकसंख्या ही या १७ कोरोनाग्रस्तांच्या घराच्या परिघात राहत असल्याने समुह संक्रमणाचा धोका वाढला होता.त्या पार्श्वभूमीवर ही जिल्ह्याच्या दृष्टीने एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. यामध्ये होम क्वारंटीनमधून आजपर्यंत ७५ जणांची तर हॉस्पीटल क्वारंटीनमधून १०७ जणांना सुटी दिली आहे. आयसोलेशन कक्षात पाठविण्यात आलेल्या ४१ जणांनाही आरोग्य विभागाने प्रोटोकॉलनुसार तपासण्या केल्यानंतर सुटी दिली. यामध्ये बुलडाणा येथून १९, खामगाव आणि शेगाव येथील आयसोलेशन कक्षातील प्रत्येकी ११ जण आहेत. सध्या बुलडाण्यात आयसोलेशनमध्ये ११, खामगावात एक आणि शेगावात ११ जण आहेत.आजपर्यत २३६ स्वॅब पाठवलेगेल्या एक महिन्याच्या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यातून २३६ व्यक्तींचे स्वॅब नमुने पाठवले असून त्यापैकी १७ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान १७६ स्वॅब नमुने हे निगेटीव्ह आलेले आहेत. अद्यापही ४३ जणांच्या नमुन्यांची प्रतीक्षा आहे. शनिवारी एकुण १६ जणांचे नमुने पाठविण्यात आलेले आहेत. यात मलकापूरचे नगराध्यक्ष, दोन नामांकित डॉक्टर व तीन कंपाऊडरचाही समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १७ जणांच्या चाचण्या पॉझीटीव्ह आल्या असल्या तरी त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झाले आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. विशेष म्हणजे जे बाधीत झालेले आहेत त्यांच्या हायरिस्क संपर्कातील व्यक्तींनाच बाधा झाली आहे. हे एक प्रकारे संक्रमण असले तरी प्रत्यक्षात समुह संक्रमणात ते मोडत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने हायरिस्क संपर्कासोबतच लो रिस्क संपर्कातील व्यक्तींचीही आरोग्य तपासणी केल्यामुळे मोठा धोकाही टळला आहे.इंडोनेशिया, मलेशियातून आलेल्या १२ जणांचेही स्वॅब नमुने गेल्या महिन्यात पाठविण्यात आले होते. त्यांचेही अहवाल हे १८ मार्च दरम्यान निगेटीव्ह आले होते. त्यामुळे या १२ जणांनाही नंतर सुटी देण्यात आली होती. आजपर्यंत सुटी देण्यात आलेल्या २२३ व्यक्तींमध्ये या विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. दरम्यान, तुर्तास तरी जिल्ह्यात समुह संक्रमणाचा धोका नाही प्रसंगी काही संदिग्ध रुग्ण वाढतीलही मात्र कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे समुह संक्रमण रोखण्यावर भर दिला जात आहे.

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस