शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

पावसाची २३ टक्के तुट; मान्सूनची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 2:38 PM

गत वर्षी आजपर्यंत झालेल्या पावसाशी तुलना करता जिल्ह्यात २३ टक्के पावसाची तूट वर्तमान स्थितीतच निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: दुष्काळाच्या कचाट्यात अडकलेल्या बुलडाणा जिल्ह्यात अद्यापही मान्सूनची हजेरी लागलेली नसतााच गत वर्षी आजपर्यंत झालेल्या पावसाशी तुलना करता जिल्ह्यात २३ टक्के पावसाची तूट वर्तमान स्थितीतच निर्माण झाली आहे. परिणामी खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकरी वर्ग जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाच्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे.जिल्ह्यात यंदा आतापर्यंत अवघा सरासरी ५.८ मिमी पाऊस पडला आहे. गतवर्षी याच कालावधीत सरासरी ३८.४ मिमी पाऊस पडला होता. त्यावरून जिल्ह्यातील एकंदरीत विदारक स्थितीची कल्पना यावी. मान्सूनचा सोडा मान्सूनपूर्व पाऊसही यंदा बुलडाण्यात पडलेला नाही. त्यामुळे दुष्काळाच्या दाहकते बुलडाणा जिल्ह्याची स्थिती अघिकच दयनिय झालेली आहे. त्यामुळे जिल्हयाला सध्या दमदार अशा मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे.बुलडाणा जिल्ह्यास सरासरी ६६८ मिमी पावसाची नोंद होते. त्या तुलनेत गेल्या वर्षी जिल्ह्यात जवळपास २९ टक्के पाऊस कमी पडला होता. त्यामुळे खरीपाचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला होता. यंदाहीही वर्तमान स्थितीत अशीच काहीशी अवस्था असून गेल्या वर्षीच्या तुलनेत वर्तमान स्थितीत पडलेल्या पावसाशी त्याची तुलना करता जिल्ह्यात २३ टक्के पावसाची तुट वर्तमान स्थितीतच दिसून येत आहे.त्यामुळे गेल्या वर्षीची दुष्काळी स्थिती व यंदाही मान्सून लांबणीवर असल्याने जिल्ह्यातील शेतकरी प्रत्यक्षात शेतात पेरणी करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात पाऊस न आल्यास कृषी विभागालाही आपत्कालीन नियोजनास सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर खरीपाचा पेरा करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. मात्र पाऊसच नसल्याने बाजारपेठेमध्येही खत, बि, बियाणे खरेदीच्या दृष्टीने मंदी आहे. दरम्यान, मोठ्या शेतकºयांनी बियाणे, खतांची खरेदी केली असली तरी प्रत्यक्ष पाऊस पडण्याची ते वाट पाहत आहे. त्यामुळे जिल्ह्याला सध्या दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.दुसरीकडे कृषी विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुर्तास आपत्कालीन नियोजन करण्याची अवश्यकता नाही. गेल्या वर्षी २४ जून ते ५ जुलै दरम्यान जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाचा पाऊस पडल्याने शेतकºयांनी पेरण्या केल्या होत्या. यंदाही स्थिती पाहता येत्या काळात जिल्ह्यात पावसाचे आगम होण्याचे संकेत आहे. त्यामुळे तुर्तास आपत्कालीन नियोजनाचा विचार करण्याची गरज नसल्याचे सुत्रांनी सांगितले. कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात कपाशीचे एक लाख ७४ हजार हेक्टर, ऊसाचे १७० हेक्टर, तेलबियांचे चार लाख आठ हजार ३१५ हेक्टर कड धान्याचे एक लाख २३ हजार २०० हेक्टर पेºयाचे नियोजन केले आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस न आल्यास कृषी विभागाचे हे नियोजन कोलमडण्याची भीती आहे. तसे झाल्यास कमी दिवसात येणाºया पिकांचा पेरा शेतकºयांना करावा लागणार आहे.तीन दिवसात पावसाचे आगमन!भारतीय हवामान खात्याकडून कृषी विभागास प्राप्त झालेल्या सुचनेनुसार येत्या तीन दिवसात बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे आगमन होण्याचे संकेत देण्यात आले आहे. यासंदर्भाने २१ जून रोजी सकाळी अनुषंगीक मॅसेज कृषी विभागास प्राप्त झाल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात जिल्हयात दमदार पावसाचे आगमन होईल, अशी आस निर्माण झाली आहे.२५ जून पर्यंत मान्सून पोहोचणार४नागपूर येथील हवामान खात्यातील अधिकाºयांशी अनुषंगीक विषयान्वये संपर्क साधला असता विदर्भ तथा बुलडाणा जिल्ह्यात २५ जून पर्यंत मान्सूनच्या पावसाचे आगमन होण्याचे संकेत सुत्रांनी दिले आहे. तुर्तास आंध्रप्रदेश, तेलंगणाचा काही पट्टा, छत्तीसगडच्या खालील भागापर्यंत मान्सून पोहोचल्याचे अधिकारी सांगत होते. दरम्यान, अद्याप अपेक्षेप्रमाणे मान्सून पुढे सरकला नसल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.सरासरी ५.८ मिमी पाऊस४यंदाच्या पावसाळ््याच्या हंगामाचा विचार करता जिल्ह्यात अद्याप एकही सार्वत्रिक स्वरुपाचा पाऊस झालेला नाही. २१ जून रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ५.८ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. सकाळी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात फक्त संग्रामपूर तालुक्यात १.४ मिमी पावसाची नोंद झाली होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊसdroughtदुष्काळ