शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

बुलडाणा जिल्ह्यात ११ महिन्यात २४ लाचखोर जाळ्यात

By admin | Published: December 15, 2014 11:44 PM

लाचखोरीत बुलडाणा महसूल विभाग अव्वल.

बुलडाणा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील ११ महिन्यात २४ लाचखोर कर्मचार्‍यांना जाळ्यात अडकवून त्यांचा भ्रष्ट चेहरा जनतेच्या समोर आणला. या लाचखोरीमध्ये प्रथम क्रमांक महसूल तर दुसर्‍या क्रमांकावर पोलीस विभाग आहे. मागील जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीपैकी या विभागाने सापळा रचून २४ लाचखोर अधिकारी कर्मचार्‍यांना जाळ्यात अडकविण्यात आले. या लाचखोरांमध्ये नेहमीप्रमाणे प्रथम क्रमांक महसूल विभागाचा लागतो. मागील अकरा महिन्यात तब्बल ९ कर्मचार्‍यांना पकडण्यात आले. यामध्ये सर्वाधिक तलाठी त्यानंतर लिपिकाचा नंबर लागतो. महसूलपाठोपाठ दुसर्‍या क्रमांकावर पोलीस विभाग येतो. पोलीस विभागातील पाच कर्मचार्‍यांना सापळा रचून पकडण्यात आले, तर आरोग्य विभाग आणि राज्य परिवहन महामंडळाचे प्रत्येकी दोन कर्मचारी आणि विक्रीकर व कृषी विभागाच्या प्रत्येकी एका कर्मचार्‍यास पकडण्यात आले, तर इतर लोकसेवकांपैकी दोन कर्मचार्‍यांना लाच घेताना पकडण्यात आले. *दुपटीने झाली वाढमागील वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून टाकलेल्या धाडीत १२ जणांना कारागृहाची हवा दाखविली होती. यामध्येही महसूल विभाग आघाडीवर होता. तर पोलीस विभाग दुसर्‍या क्रमांकावर होता. यावर्षी यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. ११ महिन्यात २४ कर्मचार्‍यांना जाळ्यात अडकविण्यात आले. देशभरात भ्रष्टाचारावर मोठी चर्चा होत असतानाही लाच घेणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.