शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

‘समृद्धी’वर धगधगला मृत्यू; २५ ठार, बस डाव्या बाजूला उलटून २५ फुटांपर्यंत घासत गेली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2023 6:04 AM

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाने हा थरार आणि मृत्यूचे धगधगते तांडव अनुभवले.

मुकुंद पाठक/नीलेश जाेशीसिंदखेड राजा (जि. बुलढाणा) : मध्यरात्र उलटून गेलेली. कीर्रर्र अंधार. सुनसान रस्ता. वायुवेगाने वाहने धावताहेत. अचानक जोरात आवाज होतो. चेंगराचेंगरी, किंकाळ्या. मदतीसाठी याचना. कारण चहूबाजुंनी त्यांना धगधगत्या काळाने मृत्यू बनून आवळलेले असते... २५ जीवांच्या देहांचा तासाभरात कोळसा झालेला असतो...

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाने हा थरार आणि मृत्यूचे धगधगते तांडव अनुभवले. कुणी पहिल्या नोकरीच्या पहिल्या दिवसाची स्वप्न डोळ्यांत साठवून निघालं होतं, तर कुणी लेकीची ॲडमिशन झाली या आनंदात होतं. ७ जणांना तेवढा बचावण्याचा वेळ आणि संधी मिळाली आणि ते काळाच्या कराल दाढेतून बाहेर पडले.

नागपूर येथील विदर्भ ट्रॅव्हल्सची (एमएच २९ बीई १८१९) वातानुकूलित बस शुक्रवारी, ३० जूनला नागपूरवरून समृद्धी महामार्गाने सायंकाळी पुण्यासाठी निघाली हाेती. बसमध्ये ३२ प्रवासी हाेते. वर्धा, यवतमाळ येथे थांबा घेत वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील राधाकृष्ण हाॅटेलला जेवणासाठी सगळे उतरले. त्यानंतर बसचा चालक बदलला. बस कारंजाजवळ असलेल्या इंटरचेंजवरून समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली.

सिंदखेड राजाकडे जाताना मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास पिंपळखुटा गावानजीक (ता. सिंदखेड राजा) चालकाला डुलकी लागली. बचावासाठी प्रवाशांनी आकांत केला. महामार्गावरून अनेक वाहने गेली. परंतु, आगीचे रौद्र रूप पाहून काेणीही मदतीसाठी धावले नाही. काहींनी व्हिडीओ शूट केले, पण पोलिसांना साधा फोनही केला नाही, असे बचावलेल्यांनी सांगितले.

मृतदेह काढताना हातही थरथरलेजीव वाचवून बसबाहेर पडलेला चालक शेख दानीश याने रुग्णवाहिकेच्या १०८ क्रमांकावर फाेन केल्यानंतर रुग्णवाहिका व अग्निशमन दल घटनास्थळी आले; ताेपर्यंत उशीर झाला हाेता. स्थानिक सिंदखेड राजा, पिंपळखुटा येथील नागरिकही मदतीसाठी धावून आले. मृतदेह बसमधून काढून रुग्णवाहिकेतून नेताना झाेळ्या कराव्या लागल्या. त्यामुळे बचावकार्यात सहभागी पाेलिस व कार्यकर्त्यांचे हातही थरथरले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात