शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भरधाव ट्रकची खासगी बसला धडक, अमरावतीचे २५ भाविक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 9:27 PM

ट्रकने दिलेल्या धडकेत खासगी बसमधील२५ भाविक जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर बिरला कॉटसीन कंपनीजवळ शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

 - हनुमान जगताप  बुलडाणा  - ट्रकने दिलेल्या धडकेत खासगी बसमधील२५ भाविक जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर बिरला कॉटसीन कंपनीजवळ शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. जखमीत आबालवृध्दांचा समावेश आहे. त्यातील ६ जणांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना बुलडाणा / अकोला हलविण्यात आले असून इतरांवर स्थानीय उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, अमरावती व वर्धा या जिल्ह्यातील भाविक नातेगोत्यांच्या माणसांसह शुक्रवारी सकाळी वणीगड (नाशिक) या तिर्थाचे दर्शन घेवून मिनीबस क्र.एमएच२७-ए-९९०५ या खाजगी वाहनाने परतीच्या वाटेवर होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मिनीबसची जबर धडक राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर मालवाहतूक करणाºया ट्रक क्र.आर.जे.१९-जीबी ८२८२ याच्याशी झाली.सदरची धडक एवढी जबरदस्त होती की, मिनीबसच्या चालकाच्या बाजुच्या भागाचा अक्षरश: चेंदाचेंदा झाला. त्यात मनोजकुमार मनोहर इरणकर (वय ४०) यशोदानगर अमरावती, रंजना मनोहर इरणकर (वय ३८), नामदेव जयराम इरणकर (वय ६५), राजकुमार भालेरावजी बाळगुधे (वय ५२), राऊत नगर नागपूर, उज्वला रविंद्र चापेकर (वय ३८) भद्रावती चंद्रपूर, वंदना रामेश्वर समर्थ (वय ३४) रा.मोजरी अमरावती, निर्मला रामकृष्णा भुरे (वय ६०), रा.करवाडी चांदुरबाजार, सुधाकर महादेवराव अंबुलकर (वय ६०), रा.मोर्शी अमरावती, सुमन सुधाकर अंबलकर (वय ५५), मैनाबाई मारोतराव लांजेवार (वय ७०), आर्वी वर्धा, कुसुम सुरेश ढोबळे (वय ४७) रा. खरवाडी चांदुरबाजार, रामकृष्ण शिवराम भुरे (वय ७३) रा.खरवाडी ता.चांदुरबाजार, राजेंद्र दयाराम वैद्य (वय ४२) रा.शिवणी रसुलपूर रा.नांदगाव खंडेश्वर, सिध्दार्थ राजेंद्र वैद्य (वय ७), सोनाली राजेंद्र वैद्य (वय ३०) रा.शिवणी रसुलपूर नांदगाव खंडेश्वर, मयुरी किशोर ढोबळे (वय १९) रा.बाभुळगाव, मुक्ता नामदेवराव हरणकर (वय ५८) रा.यशोदा नगर अमरावती, अनुजा मनोजराव इरणकर (वय १७), यशोदानगर अमरावती, अतुल नामदेवराव इरणकर अमरावती, अरविंद रविंद्र चोपकर (वय १८) रा.भद्रावती चंद्रपूर, विमल विजय पाटील (वय २८) वडाळी अमरावती, आयुष श्रीराम लांजेवार (वय १२) आर्व्ही, रोहित ज्ञानदेव समर्थ (वय १०) तिवसा, ऋतुजा मनोज इरणकर (वय १४) अमरावती, कमलबाई मनोहरराव इरणकर (वय ५८), यशोदानगर अमरावती असे २५ जण जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.मात्र त्यापैकी विमल पाटील, अनिकेत चोपकर, राजकुमार बाळगुधे, सुधाकरराव अंबुलकर, सुमन अंकुलकर, मैनाबाई लांजेवार अशा ६ जणांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना अकोला व बुलडाणा हलविण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा