२०२० मध्ये इमारत बांधकाम पूर्ण झाले असून, बावीस हजार स्क्वेअर फूट मुख्य इमारत व दहा निवासस्थाने पूर्ण झाली आहेत. या ग्रामीण रुग्णालयात पद निर्मितीस ७ जूनला सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. त्यानुसार १० नियमित व १६ बाह्ययंत्रणेकडून पदे भरण्यात येणार आहेत. एकूण २५ अधिक १ पदांना मान्यता मिळाली आहे. १० नियमित पदात वैद्यकीय अधीक्षक १, वैद्यकीय अधिकारी ३, अधिपरिचारिका ३, भांडारपाल १, औषधनिर्माण अधिकारी १ व कनिष्ठ लिपिक १ अशी १० पदे, तर बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून घ्यावयाच्या सेवांमध्ये अधिपरिचारिका ४, कनिष्ठ लिपिक १, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी १, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी १, प्रयोगशाळा सहाय्यक १, शिपाई-गट ड १, कक्षसेवक गट ड ४, वाहनचालक १ व सफाईगार गट ड २ पदांना मंजुरी मिळाली आहे.
विवेकानंद नगरातील ग्रामीण रुग्णालयात २६ पदांना मंजुरी मिळाली आहे. ही पदे लवकरच भरती करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करणार आहे.
आमदार संजय रायमुलकर