जळगाव जामोद : तालुक्यातील जामोद येथील २६ वर्षीय शेतमजुरी करणाऱ्या युवकाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना जामोद येथे दिनांक २४ ऑगस्ट रोजी रात्री घडली.
जामोद येथील माळीखेळ भागात राम मंदिराजवळील रहिवाशी असलेला विजय महादेव अंबडकार (वय २६) या युवकाने सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात मृतक तरुणाचे शव पाठविण्यात आले. तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहे.