लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: शब्द मागे घेत केली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपये कर्जमाफी मिळणार असून, यामुळे ४० लाख शेतकऱ्यांचा ७-१२ कोरा होणार आहे. नाबार्डकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीचा फायदा २ लाख ६२ हजार ४७१ शेतकऱ्यांना होणार असून, ही रक्कम १७०७ कोटी एवढी येते. याबाबत अधिकृत आकडेवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे.गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडले होते. गेल्या चार वर्षांपासून शेतमालाचे पडते भाव पाहता शेतकरी कर्जाच्या खाईत जात होता. यावर्षी तर शेतमालाच्या भावांनी कधी नव्हे असा नीचांक गाठला. तूर, सोयाबीनच्या भावाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. भरमसाट तूर, सोयाबीन उत्पादन होऊनही शेतकऱ्यांच्या हाती फार काही पडले नव्हते. सर्वच शेतमालाची हीच अवस्था असल्याने शेतकरी कर्ज भरण्यासाठी सक्षम नव्हता त्यामुळे शेतकरी कर्जमाफी द्यावी, अशी मागणी होत होती. सत्तेत येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा कर्जमाफीचा मुद्दा घेतला होता. त्याआधारे विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडले. शेतकरी वर्गही कर्जमाफीची मागणी करत होता. शासनाचे मात्र चालढकल धोरण पुढे येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना पसरली होती. त्याचा उद्रेक पुणतांबा येथून झाला. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी संपाची हाक दिल्याने राज्यातील सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांनी संप पुकारून शहरांना होणारा दूध व भाजीपाल्याचा पुरवठा रोखला. यामुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले होते. आपसूकच याचा दबाव राज्य शासनावर वाढला होता. कोंडीत सापडलेल्या राज्य शासनाने ११ जून रोजी शेतकरी कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता दिल्याची घोषणा केली. नेमका यावेळी वरुणराजाही वेळेवर बरसल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. कर्जमाफीची घोषणा केल्याने आनंदाचे वातावरण होते; परंतु तत्त्वत: सारखे शब्दप्रयोग आल्याने कर्जमाफी होणार का? होणार तर कधी, कशी? असे प्रश्न शेतकऱ्यांपुढे होतेच. कर्जमाफी ३० जून १६ पर्यंत का ३१ मार्च १७ पर्यंत, ही उत्कंठासुद्धा लागून होती. याला २४ जून रोजी पूर्णविराम मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना ह्यकर्जमाफीह्णच्या माध्यमातून सरसकट दीड लाख रुपयापर्यंत राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. यापैकी तब्बल ४० लाख शेतकऱ्यांचा ७-१२ कोरा होणार आहे. ही रक्कम ३४ हजार कोटींच्या आसपास आहे. जिल्ह्यात दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीने २ लाख ६२ हजार ४७१ शेतकऱ्यांना १७०७ कोटींची कर्जमाफी अपेक्षित आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश होतो. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला हा मोठाच दिलासा आहे. पीक कर्ज एकूण शेतकरी १,७७,५५८मुदती कर्ज एकूण शेतकरी ८४,९१३पीक कर्ज रक्कम १०८६ कोटीमुदती शेती कर्ज रक्कम ६२१ कोटीमुदती कर्ज व पीक कर्ज दोन्ही मिळून मिळणार दीड लाख रुपये कर्जमाफी, उर्वरित रक्कम भरावी लागणार
बुलडाणा जिल्ह्यात २.६२ लाख शेतक-यांना कर्जमाफी
By admin | Published: June 25, 2017 9:26 AM