येथून जवळच असलेल्या टाकरखेड मुसलमान येथील विश्वनाथ काशीराम शिंदे (५१, रा. टाकरखेड मुसलमान) यांच्या गोठ्यातील २६ ऑगस्ट रोजी रात्रीचे दरम्यान पंचवीस बकऱ्या (किंमत २ लाख रुपये) कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी गोठ्याचे कुलूप तोडून चोरून नेल्या. यावर अद्याप कोणत्याही प्रकारचा बकरी चोराचा सुगावा लागलेला दिसत नाही. तसेच १३ सप्टेंबर रोजी शे. जावेद शे. मजीद (२८, रा. अमडापूर) याचे मन नदी पुलाजवळ असलेल्या गोठ्यातील पाच बकऱ्या व एक मेंढी (किंमत ५० हजार) अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या दोन्ही चोऱ्या अमडापूर बीटमधील आहेत. या चोऱ्यांचा तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पुढील तपास ठाणेदार नागेश चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सुमेर सिंग ठाकूर हे करीत आहेत.
१५ दिवसांत २७ बकऱ्या चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:40 AM