शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

बुलडाणा जिल्ह्यात रस्ते अपघाताने घेतले २७० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 3:07 PM

जिल्ह्यात आॅक्टोबर अखेर २७० जणांनी आपले प्राण गमविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : रस्त्यांवरील अपघातामध्ये जिल्ह्यात आॅक्टोबर अखेर २७० जणांनी आपले प्राण गमविले आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व अन्य निर्माणा धीन रस्त्यांवर संबंधित यंत्रणा व कंत्राटदारांनी दुरूस्ती, खड्डे बुजविणे, सुरक्षा नियमांची व्यवस्था करावी. रस्ता सुरक्षेप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या कंत्राटदार व संबंधित यंत्रणाप्रमुख यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी तथा रस्ता सुरक्षा समिती प्रमुख डॉ. निरूपमा डांगे यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेऊन अपघात प्रवण स्थळांवर तात्पुरत्या स्वरूपातील उपययोजना त्वरित करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित रस्ता कामाचे कंत्राटदार आदी उपस्थित होते. रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकांना सातत्याने गैरहजर असलेल्या अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस देण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाल्या, रस्ता सुरक्षा हा सध्याचा ऐरणीवर असलेला विषय आहे. या विषयाशी संबंधित यंत्रणांनी गंभीरतेने काम करायला पाहिजे. समिती कामकाजासंबंधित अहवाल, अपघात घडल्यानंतर देण्यात येणारा संयुक्त अहवाल विनाविलंब सादर करावेत. रस्त्याचे काम करणाºया कंत्राटदारांवर संबंधित यंत्रणेने नियंत्रण ठेवावे. काम सुरू असताना नागरिकांना त्रास होणार नाही, अपघात घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. कंत्राटदार काम करीत नसल्यास देयकांची अदायगी थांबवावी. रस्ता काम सुरू असलेल्या यंत्रणांनी दर आठवड्याला रस्ता कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी म्हणाल्या, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती यांनी मलकापूर ते खामगांव रस्ता कामाचे सुधारीत निवीदा होईपर्यंत या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे फलक लावावेत. मेहकर फाटा ते चिखली शहर रस्त्याचे काम गतीने पुर्ण करण्याच्या सुचनाही दिल्या. यावेळी संबंधित यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा