- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातील योजनांची अमलबजावणी ‘हॉर्टनेट’ प्रणालीच्या माध्यमातून आॅनलाईन करण्यात येते. आतापर्यंत राज्यातील २ लाख ७३ हजार ६१ शेतकऱ्यांचे ‘हॉर्टनेट’ प्रणालीवर आॅनलाईन अर्ज आले असून, ३० जून ही अर्ज करण्याची अंतीम मुदत आहे. मात्र सध्या या प्रणालीची सेवा वांरवार विस्कळीत होत असल्याने फलोत्पादन अभियानासाठी आॅनलाईनचा खोडा निर्माण होत आहे. शेतकºयांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचा विकास साधण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबविण्यात येते. शेतकºयांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी हे अभियान ‘हॉर्टनेट’ प्रणालीच्या माध्यमातून आॅनलाईन करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत सुटी फुले, मसाला पीके, आंबा लागवड, हरित गृह, शेडनेट हाऊस, मल्चिंग, पॉली हाऊसमधील उच्च दर्जाचा भाजीपाला लागवड साहित्य व निविष्ठा, मनुष्यबळ विकास कार्यक्रम, पॅक हाऊस इत्यादी घटकांसाठी लाभ देण्यात येतो. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातील हॉर्टनेट लागू असणाºया बाबींसाठी (पॅक हाऊस वगळता) वैयक्तीक शेतकरी, उद्योजक, संस्था यांना लाभ घेता येतो. त्यासाठी हॉर्टनेट या संकेतस्थाळावरुन शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. आॅनलाईन अर्ज करण्याकरिता शासनाने २० जून ही अंतीम मुदत दिली होती. मात्र या मुदतीपर्यंत अनेक शेतकरी अर्ज करू शकले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकºयांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी शासनाने पुन्हा ३० जूनपर्यंत मुदत वाढ दिली होती. २९ जून पर्यंत राज्यभरातून २ लाख ७३ हजार ६१ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक अर्ज हे अहमदनगर जिल्ह्यातून म्हणजे ७५ हजार ९२७ अर्ज करण्यात आले. अर्ज करण्यासाठी एकच दिवस उरला असून हॉर्टनेट प्रणाली वारंवार बंद पडत आहे. या तांत्रिक अडचणींमुळे शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज करण्यासाठी शेतकºयांच्या महा-ई सेवा केंद्रावर रांगा लागत आहेत. मुदत संपत आल्याने काही ई-सेवा केंद्रावर रात्रीच्यावेळीही आॅनलाईन अर्ज करण्यात येत असल्याचे दिसून येते.
राज्यातील २.७३ लाख शेतकरी ‘हॉर्टनेट’वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 5:32 PM
राज्यातील २ लाख ७३ हजार ६१ शेतकऱ्यांचे ‘हॉर्टनेट’ प्रणालीवर आॅनलाईन अर्ज आले असून, ३० जून ही अर्ज करण्याची अंतीम मुदत आहे.
ठळक मुद्देशेतकºयांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचा विकास साधण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबविण्यात येते.आॅनलाईन अर्ज करण्याकरिता शासनाने २० जून ही अंतीम मुदत दिली होती. मात्र या मुदतीपर्यंत अनेक शेतकरी अर्ज करू शकले नाही. मुदत संपत आल्याने काही ई-सेवा केंद्रावर रात्रीच्यावेळीही आॅनलाईन अर्ज करण्यात येत असल्याचे दिसून येते.