लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासनाने ३१ डिसेंबर २०२०पर्यंत दस्तनोंदणी केल्यास मुद्रांक शुल्कामध्ये ३ टक्के सवलत जाहीर केलेली आहे. त्या आनुषंगाने नागरिकांनी या सवलतीचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी दस्तऐवज नोंदणीची विशेष सुविधा सर्व सह दुय्यम निबंधक, दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये करण्यात आली आहे. त्या आनुषंगाने डिसेंबर महिन्यात शनिवार व रविवारीही जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार आहे. १२ डिसेंबर, १३ डिसेंबरसोबतच १९, २०, २६ आणि २७ डिसेंबरला ही कार्यालये सुरू राहणार आहे. त्या आनुषंगाने या विशेष सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी उमेश शिंदे यांनी केले आहे. अनलॉक मोहिमे सुरू झाल्यानंतर जिल्हयात मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहारही आता सुरळीत होत आहे. त्यातच मुद्रांक शुल्कात तीन टक्के सुट देण्यात आलेली असल्याने प्रलंबीत व्यवहारांना गती मिळू शकते.
३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:07 PM