लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्ये बरोबरच त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या आत्महत्येच्या घटनेत दरवर्षी वाढ होत आहे. जिल्ह्यात सन २०१६ मध्ये शेतकरी परिवारातील २४१ तर सन २०१७ मध्ये ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांच्या कुटूंबात होत असलेली आत्महत्येची वाढ चिंताजनक असून गतवर्षी खामगांव तालुक्यातील ४२ परिवारातील सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. बारमाही दुष्काळ, पाणी पडत नसल्याने दुबार तिबार पेरणी, बि-बियाणे व खतांचे भाव वाढलेले सोबतच शेतकठयांच्या मालाला समर्थन मुल्य मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीच्या गर्तेत अडकलेला आहे यामुळे अनेक शेतकºयांच्या डोक्यावरचा कजार्चा डोंगर दरवर्षी वाढत चालला आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहे. शेतकठयांच्या पदरी पडणारी निराशाच आता त्यांच्या घरातील सदस्यांना सुध्दा जखडत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात शेतकरी कुटूंबातील ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शासन या आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरले आहे.शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्यामुळे आणि शासनाने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू न केल्यामुळे जिल्ह्यात गेल्यावर्षी म्हणजे २०१७ मध्ये शेतकरी कुटूंबातील ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकºयांच्या समस्या सोडविण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप होत आहे. शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबविण्यासाठी शासनाने निव़डणूकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात व शेतकठयांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात दोन वर्षात ३०५ आत्महत्या; शेतकरी परिवारातील सदस्यांचाही समावेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 7:54 PM
खामगाव : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्ये बरोबरच त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या आत्महत्येच्या घटनेत दरवर्षी वाढ होत आहे. जिल्ह्यात सन २०१६ मध्ये शेतकरी परिवारातील २४१ तर सन २०१७ मध्ये ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. जिल्ह्यातील शेतक-यांच्या कुटूंबात होत असलेली आत्महत्येची वाढ चिंताजनक असून गतवर्षी खामगांव तालुक्यातील ४२ परिवारातील सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.
ठळक मुद्देखामगांव तालुक्यातील ४२ परिवारातील सदस्यांनी कवटाळले मृत्यूला!