बुलडाणा : अवैधरित्या देशी दारूची विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीवरून उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून ३२ हाजार रुपयाचा मुद्दे माल पकडून कारवाई केली. या बाबत माहिती अशी की, मोताळा तालुक्यातील माकोडी शेलापूर रस्त्यावर अवैध देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांना मिळाल्यावरून अधीक्षक डी.जी. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक सचिन श्रीवास्तव यांच्या पथकातील सह. दुय्यम निरीक्षक अमोल अवचार, विशालसिंग पाटील यांनी ६ सप्टेबर रोजी छापा टाकला असता १४४ देशी दारूच्या बाटल्या व एक दुचाकी आढळून आली. पथकाने असा ३२ हजार ६१७ रुपयांचा हा मुद्देमाल जप्त करून राजू वाल्मीक सुरडकर, ओंकार रुपाजी अंभोरे रा. पिंप्री गवळी यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध दारूबंदी कायद्याने गुन्हे दाखल केले. गणेशोत्सवादरम्यान जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर कारवाई सुरू आहे.
३२ हजारांची देशी दारू जप्त
By admin | Published: September 07, 2014 12:28 AM