बुलडाणा : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर ४५ हजार ५७९ शेतकऱ्यांना ३४४ कोटी ७१ लाख रूपयांचे पिककर्ज वाटप करण्यात आले आहे.पिककर्जासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांशी तुलना करता ३५ टक्के शेतकºयांना आतापर्यंत पिककर्ज वाटप करण्यात आले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आतापर्यंत ३२ टक्के पिककर्ज वाटप केले असून २६ हजार ६०० शेतकºयांना त्याचा लाभ झाला आहे. २०१ कोटी ७६ लाख रूपयांचे पिककर्ज या बँकांनी वाटप केले आहे. खाजगी क्षेत्रातील बॅकांनी ४३ टक्के पिककर्ज वाटप केले असून २६ कोटी ४२ लाख रूपये एवढी त्याची रक्कम आहे. १ हजार १८७ शेतकºयांना त्याचा लाभ झालेला आहे. ग्रामीण बँकेने ६६ कोटी ९९ लाख रूपयांचे पिककर्ज वाटप केले आहे. तर जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने ४९ कोटी ५३ लाख २० हजार रूपयांचे पिककर्ज १० हजार ९७८ शेतकºयांना वाटप केले आहे.गतवर्षी जिल्ह्यात ६२ हजार ५९१ शेतकºयांना ५११ कोटी ३१ लाख रूपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले होते. त्या तुलनेत यंदा पिक कर्ज वाटपाची गती अधिक असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
बुलडाणा जिल्ह्यात ३४४ कोटींचे पिककर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:25 PM