लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : चिखली ते उंद्री मार्गावर टाटा मॅजिकसह ३६ गोणी गुटखा पकडला. जवळ पास सहा लाख रुपयांचा हा मुद्देमाल आहे.अमडापूरचे ठाणेदार विक्रांत पाटील यांच्यासह पोलीस उप-निरीक्षक उमेश भोसले, पोलीस कर्मचारी संजय नागवे, शिंदे, राठोड, दीपक चव्हाण, तारकसे यांनी मुसावलीबाबा दग्र्याजवळ ही कारवाई केली. जप्त माल बुलडाणा अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आला.२१ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता चिखली येथील सादिक शाह एम.एच.२८ एबी ३३८६ मध्ये हाजी निसार यांच्याकडून ३६ गोण्या गुटखा घेऊन उंद्री येथील दिवटे यांच्याकडे जात असताना ही कारवाई करण्यात आली. यात सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी माहोरे यांना याबाबत माहिती देण्यात आली; परंतु अन्न प्रशासन विभागामध्ये कर्मचार्यांची संख्या अपुरी असल्याचे दिसून आले. त्यामुळे ही कारवाई केल्यानंतर पोलिसांना अन्न प्रशासन विभागाची वाट पाहत थांबावे लागले. दरम्यान, उंद्री येथील दिवटे यांचा माल असल्याचे टाटा मॅजिकचालक यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणात आता पुढे आणखी काय कारवाई होते, याकडे लक्ष लागून आहे.
चिखली-उंद्री मार्गावर ३६ पोते गुटखा जप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:07 IST
अमडापूर : चिखली ते उंद्री मार्गावर टाटा मॅजिकसह ३६ गोणी गुटखा पकडला. जवळ पास सहा लाख रुपयांचा हा मुद्देमाल आहे. जप्त माल बुलडाणा अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आला.
चिखली-उंद्री मार्गावर ३६ पोते गुटखा जप्त!
ठळक मुद्देअमडापूर पोलिसांची कारवाईसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त