मेहकर : वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता कोरोनावाढीसाठी लक्षणे नसलेले कोरोना पॉझिटिव्ह हे घातक ठरत आहेत. तेव्हा वेळीच कोरोना रोखण्यासाठी कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. याकरिता मेहकर तालुक्यात १० एप्रिल रोजी महारॅपिड चाचणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ३६६४ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये १२४ जण पॉझिटिव्ह तर १८२ जणांचा आरटीपीसीआर अहवाल येणे बाकी आहे.
कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कोरोना चाचणी होणे गरजेचे आहे. यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णाचादेखील शोध घेण्यास मदत होते. लक्षणे नसलेले रुग्ण कोरोनाचे वाहक ठरू शकतात. यामुळे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. वेळप्रसंगी उपचार न मिळाल्याने काही रुग्णांचा मृत्यूदेखील होऊ शकतो. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मेहकर तालुक्यात १० एप्रिल रोजी महारॅपिड चाचणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ३६६४ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ३४८२ रॅपिड तर १८२ आरटीपीसीआर चाचण्या घेण्यात आल्या. या शिबिरासाठी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पंचायत समिती, नगर परिषद, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी एकत्रितपणे मेहनत घेतली व शिबिर यशस्वी केले.
प्रतिक्रिया
मेहकर तालुक्यात कित्येक खासगी दवाखान्यांत रुग्ण हे एचआरसीटी टेस्ट चाचणी उपचार घेत आहेत. यामुळे त्यांच्यापासून लागण झालेल्या रुग्णांचा आकडा समोर येत नसून प्रत्येक खासगी दवाखान्यात कोरोनासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती आरोग्य विभागास देणे बंधनकारक आहे. यामुळे इतर बधितांची ट्रेसिंग होऊन त्यांचे विलगीकरण किंवा उपचार करणे सोपे होईल.
- डॉ. महेंद्र सरपाते, तालुका वैद्यकीय अधिकारी, मेहकर
प्रतिक्रिया
महसूल, आरोग्य, पंचायत समिती, नगर परिषद यांच्या एकत्रित प्रयत्नाने मेहकर तालुक्यात महारॅपिड यशस्वीपणे पार पडले. सदर शिबिरात एकूण ४८ बूथवर ४८ टीम आणि ४५६ कर्मचारी यांच्या साहाय्याने टेस्टिंग करण्यात आली. एका दिवशी सर्वात जास्त रॅपिड टेस्ट करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- डाॅ. संजय गरकल, तहसिलदार, मेहकर
फोटो ओळीः हिवरा आश्रम येथे महारॅपिड चाचणी शिबिराला भेट देतेवेळी जि.प. सदस्य संजय वडतकर, गटविकास अधिकारी, आशिष पवार व उपस्थित आरोग्य कर्मचारी.