लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गत एक वर्षापासून शाळा बंद असल्याने हे शैक्षणिक वर्ष वाया जाते की काय? अशी भीती मनामध्ये असतानाच शिक्षणमंत्र्यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३ लाख ६५ हजार ६१७ विद्यार्थी विना परीक्षा पास झाले आहेत. कोरोना पावल्याने मुले खूश आहेत, परंतू मुलांचा पुरेसा अभ्यस न झाल्याने पालक चिंतेत आहेत.कोरोनामुळे एक वर्षापासून शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, कोणतीही परीक्षा न देता उत्तीर्ण होणार आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात आठवीपर्यंतचे ३.६५ लाख विद्यार्थी विना परीक्षा पास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 12:14 PM