याव्यतिरिक्त दुर्धर आजार असणारे, सारीचे रुग्ण याच्यावरही लक्ष केंद्रित करून त्यांचे सर्वेक्षण करण्यास प्राधान्य दिले जावे, अशा सूचनाही आरोग्य विभागाच्या वरिष्ठांकडून जिल्हास्तरावर प्राप्त झाल्या आहेत. यासोबतच जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांवरही लक्ष ठेवण्यात येऊन प्रसंगानुरूप त्यांच्या चाचण्या करण्यासही प्राधान्य दिले जावे अशा सूचना आहेत.
--दुर्धर आजार असणाऱ्यांवर लक्ष-
जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर ५६ हजार १०० च्या आसपास दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्ती असून त्यांचीही मधल्या काळात तपासणी करण्यात आली. यातील कोरोना संदिग्ध वाटणाऱ्या ५,३८८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
--कोविशिल्डचे ३६,५०० डोस--
लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आजपर्यंत जिल्ह्यात कोविशिल्ड व्हॅक्सिनचे ३५,५०० डोस उपलब्ध झाले आहेत. यासोबतच काेव्हॅक्सिनचेही जिल्ह्यास ७,१०० डोस मिळाले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात दोन प्रकारच्या लसी उपलब्ध झाल्या आहेत. यासोबतच दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणही जिल्ह्यात सुरू झाले असून १५ हजार १७५ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण अद्याप बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले.