बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ११६१ जणांचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. दरम्यान, यापैकी ७७६ जण जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ३८५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ६२, घाटनांद्रा दोन, सुंदरखेड सहा, , खामगाव ३६, उमरा दहा, पळशी बुद्रूक तीन, वर्णा सहा, मलकापूर ५७, वडोदा १६, दाताळा दहा, वरखेड सहा, चिखली दहा, हातणी दोन, सिं. राजा चार, साखरखेर्डा दोन, शेलगाव बाजार दोन, चावर्दा एक, तरोडा सहा, पिं. देवी १७, पिं. गवळी एक, तालखेड एक, मोताळा एक, शेगाव ३०, चावरा एक, गव्हाण दोन, जळगाव जामोद एक, कुरणगड बुद्रूक १३, खांडवी दोन, देऊळगाव राजा दहा, लोणार पाच, मेहकर दोन, जालना जिल्ह्यातील वरूड येथील एक, जाळीचा देव येथील दोन,, अकोला जिल्ह्यातील नया अंदुरा येथील दोन, कारंजा राम येथील एक आणि औरंगाबाद येथील एक या प्रमाणे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात ३८५ पॉझिटिव्ह; २६२ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 11:36 AM